आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

व्हर्चुअल सभा:संरक्षण मंत्री म्हणतात- नेपाळशी भारताचे रोटी-बेटीचे नाते; जे काही वाद असतील ते चर्चेतून सोडवले जातील

डेहराडून2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेपाळचा वादग्रस्त नकाशा, गोळीबार आणि भारतीयाच्या मृत्यूवर संरक्षण मंत्री

नेपाळसोबत भारताचा वाद सुरू असतानाच दोन्ही देशांचे संबंध रोटी-बेटीचे आहेत असे संरक्षण मंत्र्यांनी सोमवारी म्हटले आहे. उत्तराखंड येथे एका व्हर्चुअल सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते. लिपुलेख रोड बनल्याने नेपाळमध्ये काही गैरसमज निर्माण झाले आहेत. हे गैरसमज चर्चा करून सोडविले जातील. नेपाळची भारताचे घनिष्ठ संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये असलेले घनिष्ठ संबंध जगातील कुठलीही शक्ती तोडू शकणार नाही असेही राजनाथ सिंह म्हणाले आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे, भारत आणि नेपाळमध्ये रस्ता आणि नकाशावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 8 मे रोजी व्हर्चुअल कार्यक्रमातून लिपुलेख धारचुला रस्त्याचे उद्घाटन केले. तेव्हापासूनच नेपाळ आणि भारतमध्ये तणाव निर्माण झाला. या घटनेच्या 10 दिवसांनंतर 18 मे रोजी नेपाळने एक नकाशा जारी केला. त्यामध्ये भारताचे परिसर नेपाळने आपल्या देशाचा भाग असल्याचे दाखवले. या नकाशाला नेपाळच्या संसदेने मंजुरी देखील दिली. यावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. नेपाळने जारी केलेला नवीन नकाशा चुकीचा आहे. त्यामध्ये ऐतिहासिक तथ्य नाहीत असे भारताने म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, नेपाळसोबत वाद सुरू असतानाच लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे यांनी देखील नेपाळची सारवासारव केली होती. नेपाळ आणि भारतामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक समानता आहे. नेपाळशी असलेले भारताचे संबंध मजबूत आहेत ते भविष्यात आणखी बळकट होतील असे नरवणे म्हणाले होते.

0