आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत आणि चीनचे सैन्य लडाखमध्ये लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC) वरुन मागे होण्यास तयार झाले आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, 'चीनसोबत झालेल्या चर्चेतून पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनाऱ्यावरुन सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल.'
संरक्षण पुढे मंत्री म्हणाले की, भारतीय सैन्याने सर्व आव्हानांचा सामना केला. अनेक परिसराला चिन्हीत केले असून, तेथे सैन्य उपस्थित आहे. लडाखच्या उंच ठिकाणावरही आमचे सैन्य तैनात आहे. ज्या शहीदांच्या पराक्रमावर डिसएंगेजमेंट आधारित आहे, त्यांना हा देश नेहमी लक्षात ठेवेल.
चीनचा दावा, LAC वरील वाद संपला
संरक्षण मंत्र्यांच्या राज्यसभेतील वक्तव्यापूर्वी बुधवारी चीनच्या सरकारने दावा केला होता की, लडाखमध्ये LAC वर भारतासोबत नऊ महिन्यांपासून सुरू असलेला वाद संपला आहे. बुधवारी दोन्ही देशाकडून एकसोबतच माघार घेण्यास सुरुवात झाली आहे.
10 वी बैठक लवकरच होणार
चीनच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेंसचे प्रवक्ते वू कियानने सांगितला की, चीन आणि भारतादरम्यान झालेल्या कमांडर लेव्हलच्या 9 व्या बैठकीत डिसइंगेजमेंटवर एकमत झाले होते. या अंतर्गत दोन्ही देशाने पँगॉन्ग हुनान आणि नॉर्थ कोस्टवरुन आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.