आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

संरक्षण मंत्र्यांचा लडाख दौरा:राजनाथ फॉरवर्ड लोकेशनवर पोहचले, पॅरा ट्रूपिंग आणि सैन्य अभ्यासाचा आढावा घेतला; चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ रावत आणि लष्करप्रमुख नरवणे देखील उपस्थित

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजनाथ 2 जुलै रोजी लडाखला जाणार होते, मात्र टाळला होता, 3 जुलै रोजी मोदी अचानक पोहचले होते
  • चीन लडाखमधील वादग्रस्त भागातून माघार घेत आहे, पण पांगोग त्सो आणि देपसांगमध्ये अडून बसला

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज लडाख दौऱ्यावर आहेत. त्यांनी लेह येथे स्टकना फॉरवर्ड लोकेशनवर जवानांशी संवाद साधला. राजनाथ यांनी शस्त्रास्त्रांची पाहणी देखील केली. यावेळी सैनिकांनी पॅरा ट्रूपिंग आणि सैन्य अभ्यास देखील केला. यावेळी राजनाथ यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे देखील होते. 

दोन दिवसांच्या दौऱ्यात राजनाथ आज लडाखमधील फॉरवर्ड लोकेशन्सचा आढावा घेणार आहेत. शनिवारी ते श्रीनगरला जातील. गलवानच्या घटनेनंतर राजनाथ पहिल्यांदाच लडाख दौरा करत आहेत. 15 जून रोजी गलवाट घाटीत चीनसोबत झालेल्या हिंसक झडपेत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. 

मोदींच्या लडाख दौर्‍याच्या 13 दिवसानंतर राजनाथ पोहोचले 

याआधी राजनाथ 2 जुलै रोजी लडाखचा दौरा करणार होते. मात्र त्यांनी तो रद्द केला. दुसऱ्या दिवशी 3 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लडाखमध्ये दाखल झाले. मोदींनी चीनसोबत झालेल्या हिंसाचारात सहभागी सैन्यांना प्रोत्साहित केले आणि चीनला आव्हान देत त्याच्या विस्तारवादी धोरणावर निशाना साधला होता. 

गन हातात घेतलेले राजनाथ सिंह. त्यांच्या उजव्या बाजूला उभे असलेले लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांनी गनविषयी माहिती दिली.
गन हातात घेतलेले राजनाथ सिंह. त्यांच्या उजव्या बाजूला उभे असलेले लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांनी गनविषयी माहिती दिली.
मशीन गन हातात घेतलेले संरक्षणमंत्री. त्यांनी गोळीबारही केला. बंदूक हातात घेतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
मशीन गन हातात घेतलेले संरक्षणमंत्री. त्यांनी गोळीबारही केला. बंदूक हातात घेतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.
राजनाथ सिंह लेहच्या स्टाकना येथे सैनिकी सरावांचा आढावा घेत आहेत. चीनचे सैन्य लडाखमधील अॅक्चुअ कंट्रोलमधून माघार घेत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षणमंत्र्यांची ही भेट महत्त्वाची आहे.
राजनाथ सिंह लेहच्या स्टाकना येथे सैनिकी सरावांचा आढावा घेत आहेत. चीनचे सैन्य लडाखमधील अॅक्चुअ कंट्रोलमधून माघार घेत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षणमंत्र्यांची ही भेट महत्त्वाची आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि आर्मी चीफ जनरल मनोज मुकुंद नरवणे हे लेहच्या पुढच्या चौकीवर भारतीय सैन्य तोफ पथकासह
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत आणि आर्मी चीफ जनरल मनोज मुकुंद नरवणे हे लेहच्या पुढच्या चौकीवर भारतीय सैन्य तोफ पथकासह