आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण मंत्र्यांचा रशिया दौरा:राजनाथ सिंह यांचा एजेंडा- रशियाकडून सुखोई, मिग-29, टी-90 टँक आणि सबमरीनच्या इक्विपमेंट्सची अर्जेंट सप्लाय

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-चीन तणावा दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोमवारी तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दोन देशांच्या दरम्यान संरक्षण आणि  धोरणात्मक भागीदारीवर चर्चा होण्याची आशा आहे. यासोबतच भारत एस -400 ट्रॅयम्फ एन्टी मिसाईल सिस्टम डिलीवरीमध्ये गती आणण्यासाठी रशियावर दबाव टाकला जाऊ शकतो. राजनाथ सिंहांचा हा दौरा चीन आणि भारत दरम्यानच्या हिंसक चकमकीच्या 6 व्या दिवशी होत आहे.15 जून रोजी घडलेल्या चकमकीमध्ये गलवान घाटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. 

प्लेनने इक्विपमेंट सप्लाय मागणी करतील राजनाथ- सूत्र

न्यूज एजंसी एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, संरक्षण मंत्री राजनाथ रशियाकडून सुखोई-30एमकेआई, मिग-29, टी-90 टँक आणि किलो क्लास सबमरीनसाठी इक्विपमेंटची  तात्काळ देण्याची मागणी करुन शकतात. आधी हे इक्विपमेंट समुद्रावाटे येणार होते, पण कोरोनामुळे अनेक महिन्यांपासून हे अडकून पडले आहे. सूत्रांनी सांगितले की, राजनाथ आता रशियाला म्हणतील की, विमानाद्वारे हे सामान लवकर भारतात आणण्याची व्यवस्था करावी.

रवाना होण्यापूर्वी संरक्षण मंत्र्यांनी ट्विट केले, 'रशियाच्या भेटीचा दौरा भारत-रशिया दरम्यान संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारीवर चर्चा होईल. मी मॉस्कोमध्ये 75 व्य विक्ट्री परेड डेमध्ये देखील सभागाही होणार आहे.' राजनाथ सिंह यांचे संरक्षण सचिव अजय कुमार देखील त्यांच्यासोबत गेले आहेत. 

रशियाच्या संरक्षण मंत्र्यांना भारत-चीन तणावाची माहिती देणार  

कोरोनाचे संकट असताना रशियाने एस -400 डिफेंस सिस्टमच्या डिलीवरीमध्ये डिसेंबर 2021 पर्यंत उशीर केला आहे. भारताने गेल्या वर्षीच रशियाला 5.4 बिलियन डॉलर (40 हजार कोटी रुपये) दिले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी रविवारी स्पुतनिकला सांगितले की, राजनाथ सिंह आपल्या प्रवासादरम्यान चीन आणि भारत सीमेवरील तळावर रुसचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांना माहिती देतील. तर, या दरम्यान राजनाथ सिंह यांची चिनी अधिकाऱ्यांसोबत भेट होणार नाही. दरम्यान कोरोना संकटाच्या काळात भारतीय नेत्याची ही पहिली विदेश यात्रा आहे. 

बातम्या आणखी आहेत...