आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Defense Minister Rajnath Singh's First Flight Of Indigenous Attack Helicopter 'Prachanda' In Air Force In Jodhpur

देशाची शक्ती 'प्रचंड':जोधपूरमध्‍ये स्वदेशी अटॅक हेलिकॉप्टर ‘प्रचंड’ हवाई दलात, संरक्षणमंत्री राजनाथसिंहांचे पहिले उड्डाण

जोधपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांपैकी एक भारतीय हवाई दलास ९० व्या वर्षी जमीन व पर्वत क्षेत्रावरील लढाईसाठी सर्वात घातक स्वदेशी लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर “प्रचंड’ची शक्ती मिळाली. येथे दुर्गाष्टमीला सोमवारी झालेल्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दल प्रमुख व्ही.आर.चौधरी यांच्या उपस्थितीत ते हवाई दलात समाविष्ट केले. देशात विकसित एचसीएचला “प्रचंड’ नाव दिले आहे. राजनाथसिंह यांनी १४३ एचयू स्वाड्रनचे सीओ ग्रुप कॅप्टन दीपक विश्नोई यांच्यासोबत प्रचंडमध्ये पहिले उड्डाण केले. एअरफोर्समध्ये एलसीएचच्या पहिल्या स्वाड्रनला “धनुष’ नाव दिले आहे.

२२ वर्षांनंतर गरज पूर्ण हे विशेष लढाऊ हेलिकॉप्टर एचएएलने विकसित केले. लढाऊ विमान न जाण्याच्या स्थितीत याचा वापर होऊ शकतो. कारगिल युद्धात याची गरज भासली होती.

सुखोईसोबत जुगलबंदी सुखोई ध्वनीपेक्षाही जास्त वेगासोबत शत्रूला नेस्तनाबूत करण्यास सक्षम आहे. एलसीएच शत्रूला मागे खेचण्यात सक्षम आहे.

बातम्या आणखी आहेत...