आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Defense Ministry Said There Was No Transaction With The Israeli Firm Making Spyware, The Opposition Was Questioning The Deal; News And Live Updates

पेगाससवर सरकारचे उत्तर:संरक्षण मंत्रालय म्हणाले - स्पायवेअर बनवणाऱ्या इस्रायली फर्मसोबत कोणताही व्यवहार झाला नाही; विरोधी पक्षांकडून करारावर प्रश्न उपस्थित

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयटी मंत्र्यांनी हा दावा फेटाळला होता

पेगासस हेरगिरी प्रकरणावरुन संसदेत विरोधी पक्ष आक्रमक भूमिकेत आहे. हेरगिरी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर स्पायवेअर तयार करणाऱ्या इस्रायली ग्रुप NSO सोबत कोणताही व्यवहार झाले नसल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. भारतासह अनेक देशातील लोकांच्या फोन हेरगिरी प्रकरणी या संस्थेवर आरोप केले जात आहे.

इस्रायली NSO ग्रुप सोबत भारतीय संरक्षण मंत्रालयाचे कोणतेही ट्रांजेक्शन झाले नाही असे केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले. दरम्यान सभागृहात पेगासस हेरगिरी प्रकरणी सरकारने कोणतेही व्यवहार केले आहे का? असा प्रश्न विरोधी पक्षांकडून विचारण्यात आला होता. कारण संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्ष आक्रमक भुमिकेत दिसून येत आहे.

आयटी मंत्र्यांनी हा दावा फेटाळला होता
भारताचे आयटी मंत्री अश्विनी वैष्णवी यांनीदेखील हा दावा फेटाळून लावला होता. हे भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले होते.

संपूर्ण प्रकरण काय आहे?
भारत सरकारने 2017 ते 2019 मध्ये जवळपास 300 भारतीय मोबाईल नंबरची हेरगिरी केली होती असा दावा द गार्डियन आणि वॉशिंग्टनसमेत 16 माध्यम संस्थांनी आपल्या अहवालात केला होता. अहवालात म्हटले होते की, भारत सरकार या स्पायवेअरच्या माध्यमातून पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ता, विरोधी पक्षातील नेते आणि बिझनेसमॅनचे फोन हॅक केले आहे असा दावा या अहवालात करण्यात आला होता.

पेगासस म्हणजे काय?

  • पेगासस हे एक स्पायवेअर आहे. स्पायवेअर म्हणजे हेरगिरी किंवा पाळत ठेवण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर. याद्वारे कोणताही फोन हॅक केला जाऊ शकतो. हॅकिंगनंतर त्या फोनचा कॅमेरा, माईक, मेसेजेस आणि कॉल यासह सर्व माहिती हॅकरवर जाते. हे स्पायवेअर इस्त्रायली कंपनी NSO ग्रुपने बनवले आहे.
  • या यादीमध्ये भारतात कोणाची नावे समाविष्ट आहेत? वॉशिंग्टन पोस्ट आणि द गार्डियन यांच्यानुसार, आतापर्यंत 40 भारतीय पत्रकार, तीन प्रमुख विरोधी नेते, मोदी सरकारमधील दोन मंत्री आणि एका न्यायमूर्तींची हेरगिरी झाल्याच्या वृत्ता दुजारा मिळाला आहे. पण त्यांची नावे सांगण्यात आलेली नाही.
  • पण काही बातम्यांत असे समोर येत आहे की, हिंदुस्तान टाइम्स, इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेसच्या प्रमुख पत्रकारांची हेरगिरी झाली आहे. वॉशिंग्टन पोस्टने दावा केला आहे की, भारतात हिंदुस्तान टाइम्सचे शिशिर गुप्ता आणि द वायरचे सिद्धार्थ वरदराजन यांची हेरगिरी झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...