आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारब्बी हंगामातील कडाक्याच्या उन्हानंतर आता खरीप हंगाम धोक्यात आल्याचे दिसत आहे. यंदा खरीप हंगामाची सुरुवात खराब झाली आहे. या हंगामाच्या पहिल्या पंधरवड्यात गत हंगामाच्या याच कालावधीच्या तुलनेत पिकांची पेरणी २२% कमी झाली आहे. मान्सूनच्या उत्तरार्धात कमी पाऊस हे त्याचे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले जाते.
हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, चालू मान्सून हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे ३०% कमी पाऊस झाला आहे. १ ते २० जून दरम्यान, खरीप लागवडीसाठी राजस्थान वगळता जवळपास सर्व महत्त्वाच्या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ७८% पावसाची घट झाली आहे. आतापर्यंत ५४% कमी पावसासह महाराष्ट्र आणि गुजरात याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मते, मध्य आणि दक्षिण भारतात आतापर्यंत सर्वात कमी पाऊस पडला आहे, तर देशाचे हे भाग सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अधिक अवलंबून आहेत. अशा राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणीही सुरू केलेली नाही. राज्यात पावसाची तूट 78% उत्तर प्रदेश 54% महाराष्ट्र 54% गुजरात 41% झारखंड 36% छत्तीसगड 27% हरियाणा 16% पंजाब 12 % बिहार महाराष्ट्रात ५४ तर उत्तर प्रदेशात ७८ टक्के पाऊस कमी
कापणी 10 जून-22 10 जून-21 कडधान्ये 2.0 2.7 तेलबिया 1.3 1.9 भात 6.4 6.5 भरड धान्य 3.1 4.5 मका 2.5 3.4 (लाख हेक्टरमधील आकडेवारी, स्रोत : कृषी विभाग) उत्तर प्रदेशात आतापर्यंत पावसात सर्वाधिक घट झाली आहे पेरणीला उशीर झाल्याने उत्पादनावर परिणाम होईल
केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले की, हळूहळू पिकांच्या पेरणीला वेग येईल, परंतु उशिरा पेरणी केलेल्या पिकांची कापणीही उशिराने होईल. त्यामुळे रब्बी पिकांना फटका बसणार आहे. याशिवाय उशिरा पेरणी केलेली पिके पिकण्यास अडचणी येतात. खरिपाची पिके ऑक्टोबरपर्यंत पिकण्यासाठी तयार असावीत. अशा पिकांसाठी त्या महिन्यातील १५ दिवसांचा सूर्यप्रकाश महत्त्वाचा असतो. उशिरा पेरणी केलेली पिके ही संधी गमावतात, त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. (स्रोत : हवामान विभाग)
तूर, मूग पेरणीत ४५% पर्यंत घट
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, १० जून रोजी संपलेल्या हंगामाच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देशात एकूण ६६.५ ५लाख हेक्टरमध्ये पिकांची पेरणी झाली होती. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच कालावधीत शेतकऱ्यांनी ८५.२ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी केली होती. याचा अर्थ आतापर्यंत २१.९८% कमी पेरणी झाली आहे. तूर आणि मुगाच्या पेरणीत सर्वाधिक ४०-४५ टक्के घट नोंदवली गेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.