आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Deleting Tweets That Spread False Information On Corona, But Accounts Are Not Blocked

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्राच्या सांगण्यावरुन ट्विटरची कारवाई:कोरोनाविषयी चुकीची माहिती पसरवणारे ट्विट्स डिलीट, सरकार म्हणाले - ही कारवाई आमच्यावर टीका झाली म्हणून केलेली नाही

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार म्हणाले - आमची टीका नाही तर फेक न्यूजविरोधात कारवाई

ट्विटरने नुकतेच असे ट्विट्स डिलीट केले आहेत, ज्यांच्या माध्यमातून कोरोनावर भ्रामक माहिती पसरवली जात होती. ट्विटर प्रवक्ते यांनी रविवारी याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, अकाउंट्स ब्लॉक करण्यात आलेले नाहीत. त्यांना मेलच्या माध्यमातून कारवाईची माहिती देण्यात आली आहे.

ट्विटरने सांगितले की, सरकारने अनेक ट्विट्सविषयी आक्षेप जाहीर केला होता की, हे फेक न्यूज पसरवत आहे. यामध्ये मीडियानामा, काँग्रेसचे लोकसभा खासदार रेवांत रेड्डी, बंगालचे मंत्री मोलोय घाटक, अॅक्टर विनीत कुमार सिंह आणि दोन फिल्म मेकर्सच्या ट्विटचा समावेश आहे. ट्विटरने म्हटले की, सरकारच्या सांगण्यावरुन ही अॅक्शन घेण्यात आली आहे.

सरकार म्हणाले - आमची टीका नाही तर फेक न्यूजविरोधात कारवाई
ट्विटरने म्हटले, 'आपण कोरोनामध्ये चुकीची माहिती हँडल करत आहोत. यासाठी आम्ही प्रोडक्ट, टेक्नोलॉजी आणि ह्यूमन रिव्ह्यूचा वापर करत आहोत आणि यापुढेही आमचा प्रयत्न सुरू राहिल. ही आमची प्राथमिकता आहे.' दुसरीकडे, सरकारने ट्विटरच्या कारवाईवर म्हटले आहे की, ते सरकारच्या कोविड परिस्थिती नियंत्रित करण्याच्या शैलीवर टीका करत होते म्हणून त्यांच्यावर निर्बंध आणलेले नाही तर हे फोटो आणि बातम्या चुकीच्या माध्यमातून जनतेमध्ये पसरवत होते तसेच भीती पसरवत होते म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...