आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील कांझावाला घटनेत दिल्ली पोलिसांनी गुरुवारी पुन्हा एकदा खुलासा केला. विशेष सीपी सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितले की, आमचे 18 पथक तपास करत आहेत. आतापर्यंत क्राइम सीनची पाहणी करण्यात आलेली आहे. 5 आरोपी आमच्या ताब्यात आहेत. चौकशी सुरू आहे. त्यांच्या माहितीच्या आधारे पडताळणीही केली जात आहे. फुटेज आणि सीडीआरच्या आधारे यात आणखी दोघांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. मृत तरुणी अंजली आणि प्रत्यक्षदर्शी तिची मैत्रीण निधी यांच्याशी आरोपींचे जुने संबंध नाहीत.
कारमधील दीपकने स्वत: ड्रायव्हिंग करित असल्याचे सांगितले. चौकशीत मात्र, अमित हा वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले. याचे पुरावे आहेत. नवीन आरोपी कोण आहेत. त्यापैकी एका आरोपीचा भाऊ आहे. ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचे देखील सद्या पुरावे पुढे येत आहेत. त्यामुळे आरोपीने दुसऱ्याला सांगितले की, तू गाडी चालवत होतास, असे पोलिसांना सांग. ज्याच्याकडे गाडी होती त्यालाही माहीत होते की, गाडी कोणी नेली आहे. एकंदरीत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
आणखी एक व्हिडिओ समोर आला
दिल्लीतील कांझावाला अपघात प्रकरणातील आणखी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आरोपींची गाडी ज्या मार्गाने जात आहे, त्यामागे पोलिस व्हॅनही दिसून येत आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, 9 पोलिस कंट्रोल रूम (पीसीआर) व्हॅनने आरोपीच्या कारचा पाठलाग केला असे सांगितले जात होते पण त्यांना आरोपींची कार पकडण्यात यश आले नव्हते. अशातच ज्या ठिकाणाहून आरोपींची कार जाते. त्याच्या पाठीमागे पोलिसांची व्हॅन देखील जात असल्याचे व्हिडिओ सद्या व्हायरल झाला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दुसरीकडे, स्वत:ला अंजलीची मैत्रिण सांगणाऱ्या निधीचाही या अपघातात सहभाग असण्याची शक्यता अंजलीच्या आईने व्यक्त केली आहे. तिने प्रसारमाध्यमांना सांगितले की, मी निधीला ओळखत नाही. मी तिला कधीच अंजलीसोबत पाहिलेले नाही. अंजलीने मद्यपान केले नाही. ती कधीही नशेच्या अवस्थेत घरी आलेली नाही. त्या म्हणाल्या की, निधी जे काही सांगत आहेत. त्यावर मुळीच विश्वास नाही. निधी पूर्पपणे खोटे बोलत आहे. हा सुनियोजित कट आहे. यात निधीचा देखील सहभाग घेतला. याची चौकशी व्हावी आणि पाचही आरोपींना कठोर शिक्षा व्हावी.
कुटुंबिय म्हणाले- ही नियोजित हत्या होती, अंजलीचा मेंदू सापडला नाही
निधी म्हणाली होती- अंजली दारू पिऊन गाडी चालवत होती
फॅमिली डॉक्टर म्हणाले- अंजली नशेत नव्हती
दुसरीकडे, पीडित मुलीच्या फॅमिली डॉक्टर भूपेशने अंजलीने नशेत असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, शवविच्छेदन अहवालात मृताच्या पोटात दारू नसल्याचे आढळून आले.
त्यांनी सांगितले, 'शवविच्छेदन अहवालानुसार पोटात अन्न आढळले. तिने (अंजली) पेय घेतले असते तर केमिकलची उपस्थिती अहवालात नमूद करण्यात आली असती, परंतु अहवालात फक्त पोटात अन्न असल्याचे लिहिले आहे. डॉक्टरांनीही ही सामान्य हत्या नसल्याचे सांगितले. मृत्यूपूर्वी अंजलीवर खूप अत्याचार करण्यात आले. त्यांच्या शरीरावर 40 जखमा होत्या.
या घटनेशी संबंधित आजचे अपडेट्स
4 जानेवारी : फॉरेन्सिक रिपोर्ट आला, निर्भयाची आई अंजलीच्या कुटुंबाला भेटली
स्वत:ला अंजलीची मैत्रिण म्हणवून घेणाऱ्या निधीचाही यात सहभाग असावा, असा संशय अंजलीच्या आईने व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मृताच्या आईला भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली. दरम्यान, फॉरेन्सिक अहवाल समोर आला. यामध्ये अंजली कारमध्ये असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. अंजली गाडीच्या पुढच्या डाव्या टायरमध्ये अडकली होती, कारण या टायरच्या मागे रक्ताचे बहुतेक डाग आढळून आले होते. कारच्या खाली इतर भागातही रक्ताचे डाग आढळून आले. निर्भयाची आई आशा देवी यांनी अंजलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
सर्व आरोपी पोलिस कोठडीत
सध्या पाच आरोपी मनोज मित्तल, दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा आणि मिथुन तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी दीपक खन्ना कार चालवत होते. त्यापैकी मनोज मित्तल हे भाजपचे नेते असल्याचे बोलले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.