आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील कांझावाला हिट अँड रन प्रकरणा संदर्भातील आणखी व्हिडिओ समोर आला आहे. निधी त्या रात्री मृत अंजलीसोबत स्कूटीवर बसलेली तिची मैत्रीण निधी घरी परतत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रात्री 2.30 वाजता ती घरी परतल्याचे दिसून येते. तिच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, ती खूप घाबरली होती. तिला दुखापत झालेली होती. तिने मोबाईल चार्ज करण्यासाठी शेजाऱ्याकडे चार्जर मागितला होता.
दिव्य मराठी न्यूज नेटवर्कचे रिपोर्टरने निधीच्या शेजाऱ्यांशी संवाद साधला आहे. त्याने नाव न सांगता संपूर्ण घटना सांगितली. शेजारी म्हणाला- निधी परत आली तेव्हा ते 3 ते 4 वाजले होते. तेव्हा काही लोक शेकोटी करून बसले आहे. निधीने सर्वप्रथम तिच्या घराचे गेट ठोठावले. गेट न उघडताच ती त्याच्याकडे आली. ती घाईत होती. तिचा फोन बंद होता. यानंतर सकाळी निधीनेही सर्वांना सांगितले होते की, तिचा अपघात झाला आहे, पण तिच्यासोबत दुसरी मुलगी असल्याचे तिने सांगितले नव्हते. दुसरीकडे, प्राथमिक फॉरेन्सिक अहवालात अंजली कारमध्ये असल्याचा पुरावा मिळालेला नाही. याआधी मंगळवारी अंजलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्कार झाला नसल्याची पुष्टी झाली होती.
अपघातात कारस्वारांची चूक होती
दिल्लीतील कांझावाला 'हिट अँड रन' प्रकरणात अंजलीच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार पोलिसांनी हा दावा केला आहे. तर या अहवालात तिच्यावर बलात्कार झालेला नाही, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे, अंजलीची मैत्रीण निधीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, अपघातात कारस्वारांची चूक होती. मात्र, अजंली देखील नशेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या घटनेची प्रत्यदर्शी असलेल्या निधीने हा दावा केला आहे. पोलिस जबाबात निधी म्हणाली की, मी स्कूटी चालवू का अशी विनंती तिने अंजलीला केली होती. पण तिने मला स्कूटी चालवायला दिली नाही. त्यानंतर काही वेळाने कारची धडक झाली. तेव्हा मी एका बाजूला फेकले गेले. ती गाडीखाली अडकली. त्यानंतर कारने तिला फरफटत नेले. मला हे सर्व पाहून भीती वाटली म्हणून मी तेथून पळ काढला आणि कोणालाही काही सांगितले नाही. त्याचवेळी आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, स्कूटी रस्त्यावर स्थिर चालत नव्हती. अशातच हा अपघात झाला. दरम्यान, पोलिस दोन्ही बाजूंची तपासणी करित आहेत.
पोस्टमॉर्टममध्ये डोक्याला, मणक्याला मार
दिल्लीचे विशेष आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) एसपी हुड्डा यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टममध्ये अंजलीच्या डोक्याला, मणक्याला आणि डाव्या बाजूला जखमा झाल्या होता. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यू अखेरच तिचा मृत्यू झाला. रिपोर्टमध्ये कुठेही बलात्काराची पुष्टी नाही. यापूर्वी, पीडिता तिची मैत्रिण निधीसोबत स्कूटीवर होती. असा खुलासा पोलिसांनी केला होता. धडकेनंतर मृत तरूणी कारमध्ये अडकली आणि 12 किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्या गेली. तर त्यापूर्वी पोलिसांनी 4 किमी फरफटत नेल्याचा दावा केला होता. अपघातानंतर स्कूटीवर असलेली दुसरी तरुणी घटनास्थळावरून पळून गेली. तिलाही किरकोळ दुखापत झाल्याची सांगितले गेले.
पोलिस संरक्षणात तरुणीवर अंत्यसंस्कार
दिल्लीतील मंगोलपुरी येथील वाय ब्लॉक स्मशानभूमी (विजय विहार रोड) येथे तरुणी अंजलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तत्पूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली. खटला लढण्यासाठी सर्वोत्तम वकील नियुक्त केला जाईल, असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी अंजलीच्या आईने प्रसारमाध्यमांना सांगितले की, पाचही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. माझ्या मुलीचे अंतिम संस्कार झाले म्हणून जनता गप्प बसणार नाही.
हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजवरून उघड
रोहिणी परिसरातील एका हॉटेलसमोरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी हा खुलासा केला आहे. यामध्ये मृतक तिच्या मैत्रिणीशी संवाद साधताना दिसत आहे. यानंतर दोघेही स्कूटीवरून निघून जातात. दरम्यान, त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, पीडितेसोबत तिचा मित्रही होता. दोघांनी कागदपत्रे देऊन रूम बुक केली होती. काही मुलं पण आली, त्यांनी वेगळी रूम बुक केली. यानंतर तो मुलींच्या खोलीत गेला आणि तेथे सुमारे 5 मिनिटे थांबला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.