आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीत बुधवारी एका तरूणीवर अॅसिड हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. द्वारका परिसरात सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. तरुणी आपल्या लहान बहिणीसोबत जात होती, तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने त्या मुलीवर अॅसिड फेकले.
सफदरजंग रुग्णालयात केले दाखल
ज्या मुलीवर हल्ला झालेला आहे. तीची प्रकृती गंभीर झालेली आहे. तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या वडीलांनी ओळखीच्या दोन जणांवर संशय घेतला आहे. मुलीच्या वडिलांनी मीडियाला सांगितले की, मुलीची प्रकृती गंभीर आहे. आज सकाळी माझ्या मुली एकत्र बाहेर गेल्या होत्या. अॅसिड फेकणाऱ्या दोन्ही आरोपींनी त्यांचे तोंड कपड्याने बांधलेले होते.
मुलीचा चेहरा 8 टक्के भाजला - द्वारका डीसीपी
मुलगी 8 टक्के भाजली आहे. एका मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान आणखी एक मुलगा प्रमुख संशयित म्हणून समोर आला असून आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे व्दारका डीसीपींनी सांगितले.
व्हिडिओ झाला व्हायरल
घटना घडल्यानंतर पोलिसांना सकाळी 9 वाजता या घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतली आहे. ही घटना एका सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी तो व्हिडिओ मिळवला. त्या दिशेने तपास केला जात आहे. तर या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
राज्य महिला आयोगाने विचारले- कुणाला कायद्याची भीती नाही का ? या घटनेवर चिंता व्यक्त करत दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी विचारले - देशाच्या राजधानीत भरदिवसा 2 बदमाशांनी एका शाळकरी मुलीवर अॅसिड फेकले आणि तेथून पळ काढला. आता कुणाला कायद्याची भीती वाटत नाही का? ऍसिडवर बंदी का नाही? ही मोठी लज्जास्पद बाब आहे.
त्यांनी दुसरे ट्विट करून लिहले की, भाज्यांप्रमाणे अॅसिड सहज उपलब्ध आहे. सरकार त्याच्या किरकोळ विक्रीवर बंदी का घालत नाही? दिल्ली महिला आयोग अनेक वर्षांपासून यावर बंदी घालण्याची मागणी करत होती. सरकारला याची जाग कधी येणार आहे. त्याचवेळी राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सफदरजंग रुग्णालयात एक पथक पाठवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.