आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi AIIMS Server Hacking China Connection | Data Successfully Retrieved, AIIMS Latest News

चीनी हॅकर्सने केला होता AIIMS च्या सर्व्हरवर अ‌ॅटक:5 सर्व्हरमधील डाटा रिकव्हर, ओपीडीच्या ऑनलाईन नोंदणीला सुरूवात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली AIIMS सर्व्हर हॅकिंग प्रकरणात चीनचा कट उघडकीस आला आहे. एम्सच्या सर्व्हरवर चीनी हॅकर्सनी हल्ला केल्याची केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पुष्टी केली आहे. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, एम्समधील 100 पैकी 5 सर्व्हर हॅक झाले होते, या सर्वांचा डेटा पुनर्प्राप्त करण्यात आला आहे. ओपीडीची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.

दरम्यान, हॅकिंगमध्ये चीनचा हात असण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. हॅकिंगदरम्यान एम्सचा वैयक्तिक डेटाही लीक झाल्याचे त्यांनी सांगितले. 23 नोव्हेंबर रोजी दिल्ली एम्समध्ये सर्व्हर हॅक झाल्यामुळे डॉक्टरांना त्यांच्या ई-सर्व्हरवर लॉग इन करता आले नाही.

सायबर हल्ल्यामागे दोन चिनी गट
हॅकिंगचा तपास करणार्‍या अधिकाऱ्याने सांगितले की, सायबर तज्ञांच्या मते, दोन चीनी रॅन्समवेअर गट - एम्परर ड्रॅगनफ्लाय आणि ब्रॉन्झ स्टारलाइट (DEV-0401) या हल्ल्यामागे असू शकतात. त्याचवेळी, दुसरा संशय लाइफ नावाच्या गटावर होता. जो वानरेन नावाच्या रॅन्समवेअरची नवीन आवृत्ती असल्याचे मानले जाते. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने हॅकर्सनी डेटा डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली असावी, असेही तपासात दिसून आले आहे.

डार्क वेब हा इंटरनेट सर्चिंगचा एक भाग

डार्क वेब हा इंटरनेट सर्चिंगचा एक भाग आहे, पण तो साधारणपणे सर्च इंजिनवर शोधता येत नाही. या प्रकारची साइट उघडण्यासाठी, एक विशेष ब्राउझर आवश्यक आहे, ज्याला टॉर म्हणतात. टोर एन्क्रिप्शन टूलच्या मदतीने डार्क वेबच्या साइट्स लपवल्या जातात. अशा परिस्थितीत, जर एखाद्या वापरकर्त्याने चुकीच्या मार्गाने हे प्रवेश केले तर त्याचा डेटा चोरीला जाण्याचा धोका आहे.

हॅकर्सनी एम्सकडून 200 कोटींची खंडणी मागितली होती

गेल्या मंगळवारी एम्स दिल्लीचा सर्व्हर हॅक करणाऱ्यांनी 200 कोटींची मागणी केली होती. हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीमध्ये पेमेंट करण्यास सांगितले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी कोणत्याही प्रकारची खंडणी मागितली गेली नसल्याचे सांगितले आहे.

23 नोव्हेंबरला काय घडले? संपूर्ण प्रकरण समजून घ्या...

  • एम्समध्ये सकाळी 6.45 वाजता इमर्जन्सी लॅबच्या कॉम्प्युटर सेंटरमधून रुग्णांचे रिपोर्ट्स मिळत नसल्याची तक्रार सुरू झाली. यानंतर बिलिंग सेंटर आणि विभागातूनही असेच काही कॉल्स येऊ लागतात. एनआयसी टीमने तपास केला असता सर्व फाईल्स मुख्य सर्व्हरवर ओपन होत नसल्याचे आढळून आले.
  • जेव्हा टीमने बॅकअप सिस्टमद्वारे फायली पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असे आढळून आले की, तिथे देखील हॅकर्सने अ‌ॅटक केला आहे. त्यानंतर पुढील तपासात असे आढळून आले की, क्लाउडमध्ये फाइल्स ठेवलेल्या एक्स्टेंशन म्हणजेच ई-पत्त्यातही बदल करण्यात आला आहे. सायबर हल्ल्याच्या प्रकरणाला पुष्टी मिळाली आहे. यासाठी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) चीही मदत घेण्यात आली.

रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे
रुग्णालयातील सेवा अजूनही प्रभावित असून मॅन्युअल पद्धतीने काम सुरू आहे. ज्यामध्ये बाह्यरुग्ण, रूग्ण, प्रयोगशाळा इ. दरम्यान, दिल्ली एम्समध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने गर्दी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑनलाइन अपॉइंटमेंटचे काम होत नसल्याने रुग्ण थेट रुग्णालयात येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...