आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Air Pollution Updates, CM Arvind Kejriwal Compared With Hitler, Posters Put Up In Delhi, BJP Leader Bagga Criticizes Delhi CM

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची हिटलरशी तुलना:दिल्लीत लागले पोस्टर, भाजप नेते बग्गा म्हणाले- हुकूमशहानंतर यांचाच नंबर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत वाढत असलेल्या हवेच्या प्रदूषणावरून केजरीवाल सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हवेचे प्रदूषण अत्यंत धोकादायक पातळीवर गेले आहे. भाजप नेते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुलना क्रूरकर्मा हुकूमशहा हिटलरशी केली आहे. त्यांनी या आशयाचे पोस्टरही दिल्ली भाजप कार्यालयाबाहेर लावले आहेत.

वृत्तसंस्थेशी बोलताना बग्गा म्हणाले की, त्यांनी (केजरीवाल) दिल्लीला गॅस चेंबरमध्ये रूपांतरित केले आहे. इथं लोकं प्रदूषणामुळे मरत आहे आणि त्यांचं मात्र राजकीय पर्यटन सुरू आहे.

भाजप नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी हे पोस्टर लावले आहे.
भाजप नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी हे पोस्टर लावले आहे.

दिल्ली भाजप मुख्यालयाबाहेर लावले पोस्टर

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या विरोधात लावलेल्या पोस्टरची सध्या चर्चा सुरू आहे. भाजप नेते तेजिंदरपाल सिंग बग्गा यांनी लावले आहे. या पोस्टरवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुलना नाझी हुकूमशहा हिटलरशी करण्यात आली आहे. पोस्टरवर लिहिले आहे की, केजरीवाल हे दुसरे आहेत, तर हुकूमशहा ज्यांनी त्याचे शहर गॅस चेंबरमध्ये बदलले तो हिटलर पहिला होता. याच पोस्टरवर तेजिंदरपाल सिंग बग्गा यांच्यातर्फे जनहितार्थ प्रकाशित करण्यात आल्याचेही लिहिले आहे.

दिल्लीत आरोग्य आणीबाणी, प्रदूषण गंभीर पातळीवर, विविध निर्बंध

प्रदूषणामुळे दिल्लीचा श्वास गुदमरला आहे. येथील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून एअर क्वालिटी इंडेक्स ( एक्यूआय) 445 वर गेला आहे. प्रदूषणाची अत्यंत गंभीर स्थिती पाहून दिल्ली सरकारने इयत्ता 5 वीपर्यंतच्या शाळांना सुटी जाहीर केली आहे. शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सांगण्यात आले आहे. बांधकामे, उत्पादन क्षेत्रातील कामे स्थगित करण्यात आली असून डिझेल कार, ट्रकवर बंदी घालण्यात आली आहे.

प्रदूषणाची अत्यंत गंभीर स्थिती पाहून दिल्ली सरकारने इयत्ता 5 वीपर्यंतच्या शाळांना सुटी जाहीर केली आहे.
प्रदूषणाची अत्यंत गंभीर स्थिती पाहून दिल्ली सरकारने इयत्ता 5 वीपर्यंतच्या शाळांना सुटी जाहीर केली आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही धार

दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी पंजाबचे सीएम भगवंत मान यांना पत्र लिहिले. पंजाबमध्ये यंदा 24 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत 19% जास्त भाताच्या पेंढ्या जाळण्यात आल्या. भगवंत मान प्रत्युत्तरात म्हणाले, दिल्लीत लोकनियुक्त सरकारच्या कामात आडकाठी आणता आणि मला चिठ्ठी लिहून राजकारण करता. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर म्हणाले, 3 हजार कोटी खर्च करून राज्यांना 2 लाख मशीन दिल्या तरी ही स्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...