आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीची हवा आजही विषारी:राजधानीत AQI 386, हवेची गुणवत्ता खूप खराब कॅटेगिरीमध्ये

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजधानी दिल्लीमध्ये वायू प्रदुषणात आजही थोडा दिलासा मिळाला आहे. काल दिल्लीमध्ये AQI म्हणजेच हवेची गुणवत्ता 476 होती, जी आज कमी होऊन 386 झाली आहे. म्हणजेच हवेमध्ये थोडी सुधारणा झाली आहे. मात्र हवा अजुनही खूप खराब कॅटेगिरीमध्ये आहे. शनिवारी सुप्रीम कोर्टाने प्रदुषणाविषयी केंद्र सरकारला फटकारले होते आणि प्रदुषणाला नियंत्रित करण्यासाठी इमरजेंसी प्लान सांगण्यात सांगितले होते. यानंतर संध्याकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंशिक लॉकडाऊन लावले होते.

इतर प्रमुख शहरांमध्ये वायु प्रदुषणाची परिस्थिती

उत्तर प्रदेश

शहरAQIकॅटेगिरी
नोएडा338खूप खराब
बुलंदशहर340खूप खराब
लखनऊ300खराब
प्रयागराज144

सामान्य

मध्य प्रदेश

शहरAQIकॅटेगिरी
ग्वालियर303खूप खराब
जबलपुर297खराब
इंदौर185सामान्य
भोपाळ240खराब

राजस्थान

शहरAQIकॅटेगरी
जयपुर347खूप खराब
जोधपुर272खराब
उदयपुर302खूप खराब

दिल्ली सरकारने एका आठवड्यासाठी सर्व शाळा बंद केल्या आहेत, तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनाही घरून काम करण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय राजधानीत आंशिक लॉकडाऊनसारखे हे निर्णय प्रदूषणाच्या मुद्द्यावर तातडीच्या बैठकीत घेण्यात आले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे निर्णय जाहीर केले आणि आम्ही संपूर्ण लॉकडाऊनच्या पद्धतींवरही विचार करत आहोत, असा इशारा दिला. तसेच खाजगी वाहने बंद करण्याचा विचार आहे. सर्व बांधकामे ठप्प झाली आहेत.

काल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले होते
दिल्लीच्या दिवसेंदिवस विषारी हवेमुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे. न्यायमूर्ती एनव्ही रमणा दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर एका याचिकेवर सुनावणी करत होते. त्यांनी सरकारला फटकारले आणि म्हटले की, परिस्थिती किती गंभीर आहे ते तुम्ही पाहत आहात. आपण आपल्या घरातही मास्क लावून फिरत आहोत. सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील शाळा सुरू करण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासनाने तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे. जसे की वाहने थांबवणे आणि दिल्लीत लॉकडाऊन लागू करणे.

बातम्या आणखी आहेत...