आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Arms Smuggling Gang Busted Updates । 6 Arrested With 2000 Live Cartridges Revealed

दिल्लीत शस्त्रास्त्र तस्करी करणारी टोळी जेरबंद:2000 जिवंत काडतुसांसह 6 जणांना अटक; चौकशीत लखनऊला नेत असल्याचा खुलासा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली पोलिसांनी आनंद विहार परिसरातून शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीच्या 6 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 2000 जिवंत काडतुसांसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. एसीपी विक्रमजीत सिंह यांनी सांगितले की, ही खेप लखनऊसाठी होती. हा गुन्हेगारी नेटवर्कचा भाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमागे दहशतवादाचा अँगल असल्याचे त्यांनी नाकारले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने, 14 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत दिल्ली मेट्रो स्थानकांवर पार्किंग उपलब्ध होणार नाही. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने म्हटले आहे की, मेट्रो ट्रेन सेवा नेहमीच्या वेळापत्रकानुसार सुरू राहील.

दिल्लीत अलर्ट जारी

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर इंटेलिजन्स ब्युरो (IB) ने बुधवारी अलर्ट जारी केला आहे. दिल्ली पोलिसांना 10 पानी अहवाल सादर करण्यात आला असून त्यात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयबीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबासारख्या दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIS ने दोन्ही दहशतवादी संघटनांच्या नेत्यांना हल्ले करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर 7 हजार दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.
15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर 7 हजार दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.

अहवालात उदयपूर आणि अमरावती येथील हत्यांचा उल्लेख

आयबीने आपल्या अहवालात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची नुकतीच झालेली हत्या आणि उदयपूर, अमरावती येथील घटनांचा उल्लेख केला आहे. दिल्ली पोलिसांना गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. लाल किल्ल्याभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. लाल किल्ल्यावर सर्वसामान्यांच्या प्रवेशावर अधिक कडक निगराणी असल्याचे सांगण्यात आले आहे. यासोबतच टिफीन बॉम्ब, स्टिकी बॉम्बच्या धोक्यासाठीही सतर्क राहण्याच्या सूचना आयबीने पोलिसांना दिल्या आहेत.

परगल आर्मी कॅम्पमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात 2 दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी रात्री उशिरा काही दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला. यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. या गोळीबारात लष्कराचे तीन जवान सुभेदार राजेंद्र प्रसाद, रायफल मॅन मनोज कुमार आणि रायफल मॅन लक्ष्मणन डी हे जागीच शहीद झाले. 5 जवानही जखमी झाले आहेत. राजौरीपासून परगल कॅम्प 25 किमी अंतरावर आहे. 11 राष्ट्रीय रायफल्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या छावणीवर हा आत्मघाती हल्ला होता.

देशात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी

यंदा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. केंद्र सरकारने 15 दिवसांच्या कार्यक्रमात 'हर घर तिरंगा अभियान' सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करणार आहेत. अशा परिस्थितीत यंदाचा स्वातंत्र्यदिन खास असणार आहे. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर 7 हजार दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. यासोबतच प्रत्येक टप्प्यावर 1000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...