आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Trust Vote Resolution In Delhi Assembly Is Today, Arvind Kejriwal Will Present The Trust Vote Resolution

केजरीवाल सरकारची आज 'विश्वास' परीक्षा:स्वतः मुख्यमंत्री मांडणार विश्वासदर्शक ठराव; बहुमत चाचणीकडे देशाचे लक्ष

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजधानी दिल्लीत आम आदमी पक्ष आणि भाजपत राजकीय संघर्ष सुरू आहे. यामुळेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सादर करणार आहेत. यादरम्यान जोरदार गदारोळाचीही शक्यता आहे. दिल्लीत आप सरकार पाडण्यासाठी भाजपने आमदारांना 20-20 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता. त्यामुळेच ते विश्वासदर्शक ठराव मांडत आहेत.
केजरीवालांनी का निवडला विश्वासदर्शक ठरावाचा मार्ग?
संसदीय प्रक्रियेनुसार राज्य विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणला जातो. यानुसार विद्यमान सरकार म्हणजेच मुख्यमंत्रीच हा ठराव मांडतात. अध्यक्षांनी प्रस्ताव स्वीकारल्यानंतर सत्ताधाऱ्यांना सदनात बोलण्याची संधी मिळते.
विशेष परिस्थितीत राष्ट्रपती किंवा राज्यपालही सरकारला सदना विश्वासदर्शक ठराव जिंकण्यास सांगू शकतात. या स्थितीत सरकारने हा ठराव जिंकला तर 15 दिवसांनंतर विरोधी पक्ष पुन्हा त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतात.
केजरीवाल सहज जिंकू शकतात विश्वासदर्शक ठराव
शुक्रवारी 26 ऑगस्ट रोजी दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनातही जोरदार गदारोळ झाला होता. सदनाच्या कारवाईचे चित्रीकरण केल्यामुळे भाजपच आमदारांना मार्शल्सकडून बाहेर काढण्यात आले होते. दिल्ली विधानसभेत आपचे 62 आमदार आहेत, तर भाजपचे केवळ आठ. त्यामुळेच केजरीवाल विश्वासदर्शक ठराव सहज जिंकतील अशी शक्यता आहे.

राजघाटावर शक्तीप्रदर्शन
गेल्याच आठवड्यात केजरीवालांनी राजघाट येथे शक्तीप्रदर्शन केले होते. तिथेच ते म्हणाले होते की, मी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणू इच्छितो. जेणेकरून हे सिद्ध होऊ शकेल की भाजपचे ऑपरेशन लोटसचे दिल्लीत ऑपरेशन चिखल झाले आहे.
आप-भाजपतील संघर्षाचे कारण
अबकारी धोरणावरून 19 ऑगस्ट रोजी मनीष सिसोदीयांच्या घरावर CBI ने छापेमारी केली होती. 14 तास ही कारवाई चालली होती. या प्रकरणी CBI ने PMLA कायद्यानुसार खटला दाखल केला होता. तेव्हापासून AAP ने केंद्रातील भाजप सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने आपल्याला AAP सोडून भाजपत येण्याची आणि CM बनविण्याची ऑफर दिल्याचे सिसोदीया यानंतर म्हणाले होते. आपकडून भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून वाचण्यासाठी खोटा प्रचार केला जात असल्याचे उत्तर भाजपने याला दिले होते.
विश्वासदर्शक ठरावानंतर पडले होते वाजपेयी सरकार
1998 मध्ये लोकसभेत तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी विश्वासदर्शक ठराव मांडला होता. यावर मोठी चर्चा झाली होती. यादरम्यान संसदीय इतिहासातील तर्क-वितर्क ऐकायला मिळाले होते. अखेरीस झालेल्या मतदानानंतर वाजपेयी सरकार एका मताने पडले होते. संसदात एका मताने सरकार पडण्याची ही घटना ऐतिहासिक मानली जाते.
भारतीय संसदेच्या इतिहासात 12 वेळा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यात 3 वेळा सरकार पडले होते. 1990 मध्ये व्ही पी सिंह यांचे, 1997 मध्ये एचडी देवेगौडांचे तर 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयींचे सरकार पडले होते.

बातम्या आणखी आहेत...