आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपच्या दारुन पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आदेश यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांना आपला राजीनामा सुपूर्द केला. नड्डा यांनी तो लागलीच मंजूर केला. तसेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी उपाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्याकडे सोपवली आहेत.
MCDचा निकाल येताच दिला होता राजीनामा
आदेश गुप्ता यांनी 8 डिसेंबर रोजी MCD (Municipal Corporation of Delhi)निवडणुकीचा निकाल येताच भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना आपला राजीनामा पाठवला होता. पक्षातील चर्चेनंतर रविवारी त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.
भाजपने एका निवेदनाद्वारे आदेश गुप्ता यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या पदाची जबाबदारी वीरेंद्र सचदेवा यांच्याकडे सोपवण्यात आल्याचेही स्पष्ट केले. पुढील आदेश येईपर्यंत सचदेवा यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असेल.
विधानसभेतील पराभवानंतर मनोत तिवारींनी सोडले होते
2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा आम आदमी पार्टीकडून पराभव झाला होता. तेव्हा मनोज तिवारी दिल्लीच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी होते. निवडणुकीनंतर त्यांनी पराभवाची जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आदेश गुप्ता यांची जवळपास 2 वर्षांपूर्वी दिल्लीच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
MCD च्या 250 पैकी 134 जागांवर आपचा विजय झाला. तर भाजपने 104 वार्डांत विजय मिळवला. काँग्रेसला 9, तर इतर उमदेवारांना 3 वार्डांत विजय झाला. ---------------------------
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.