आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील आदर्शनगर भागात सोमवारी ब्रेकअपच्या रागातून एका तरुणाने तरुणीवर चाकूने वार केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जखमी मुलीला बाबू जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे. सुखविंदर असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
5 वर्षांपूर्वी मैत्री, ब्रेकअपनंतर मुलाने केले वार
पीडित मुलगी दिल्ली विद्यापीठात बीए करत आहे. त्याची सुखविंदरशी 5 वर्षांपूर्वी मैत्री झाली होती. त्यांचे हे नाते मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हते, त्यामुळे मुलीने त्याच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली. सुखविंदरला हे सहन होत नव्हते. त्याने सोमवारी मुलीला भेटण्यास सांगितले. मुलीने त्याच्याशी संबंध का तोडले हे त्याला जाणून घ्यायचे होते. मुलगी घराजवळच्या गल्लीत त्याला भेटायला गेली. यानंतर सुखविंदरने तिच्यावर चाकूने हल्ला केला.
दिल्ली अपघात-पीडितेवर रेप नाही : मैत्रीणीचा दावा- नशेत स्कूटी चालवत होती अंजली
दिल्लीतील कांझावाला 'हिट अँड रन' प्रकरणात अंजलीच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर जखमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार पोलिसांनी हा दावा केला आहे. तर या अहवालात तिच्यावर बलात्कार झालेला नाही, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. संपूर्ण बातमी येथे वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.