आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील विजय पार्क परिसरात बुधवारी 5 मजली इमारत कोसळली. ही इमारत सुमारे 20 वर्ष जुनी होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ती अचानक झुकली होती. त्यानंतर धोका लक्षात घेता संपुर्ण इमारत खाली करण्यात आली.
आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती नसली तरी परिसरातील काही घरांचे नुकसान झाले आहे.
ढिगारा हटवण्यासाठी पथक जमले
दिल्ली पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. डेब्रिज हटवण्याचे काम सुरू आहे. इमारत कोसळल्यामुळे आजूबाजूच्या विद्युत ताराही तुटल्या असून त्या दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. इमारत कोसळली तेव्हा खाली काही वाहनेही उभी होती, जी ढिगाऱ्याखाली आली. त्यांनाही बाहेर काढले जात आहे.
इमारत कोसळताच लोकांनी इकडे-तिकडे धावू लागले
इमारत कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात एक 29 सेकंदाचा व्हिडिओ देखील आहे, ज्यामध्ये 5 सेकंदात पाच मजली इमारत उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. इमारत कोसळताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी स्वत:ला वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धाव घेतली. मात्र, कोणत्याही प्रकारची हानी झाल्याची माहिती नाही.
लखनऊमध्ये 5 मजली इमारत कोसळली, 2 ठार
लखनऊमधील हजरतगंजमधील 5 मजली अलाया इमारत मंगळवारी संध्याकाळी कोसळली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली दोन जण गाडले गेले आहेत. यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे. 17 तासांपासून त्यांची सुटका करण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफसह लष्कराचे पथक बचावकार्यात गुंतले आहे. आत्तापर्यंत यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
ठाण्यात इमारतींना तडे, छत कोसळले: 250 कुटुंबांचे स्थलांतर
इमारतींना अचानक तडे
ठाण्यात छताला आणि खांबांना तडे गेल्याने 5 इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. या इमारतींमध्ये 250 कुटुंबे राहत होते. ठाणे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही इमारतींचे छत कोसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कुटुंबांना धोकादायक इमारतींमधून बाहेर काढले जात आहे.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या इमारतींना शनिवारी तडे गेले. यानंतर अग्निशमन विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतींची पाहणी केली. इमारतींना अचानक तडे का गेले, हे अद्याप कळू शकलेले नाही. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.