आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

डिझेल होणार स्वस्त:दिल्ली मंत्रिमंडळाने वाहनांच्या इंधनावरील व्हॅट केला कमी, प्रति लिटर 8 रुपयांपेक्षाही जास्त स्वस्त होणार डिझेल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य कॅबिनेटने व्हॅट 30 % वरुन कमी करत 16.64 करण्याचा निर्णय घेतला आहे
  • डिझेलची किंमत जवळपास 82 रुपयांनी कमी होऊन 73.64 रुपये प्रति लिटरवर येणार

डिल्लीमध्ये डिझेल प्रति लीटर 8 रुपयांपेक्षा जास्त किंमतीने कमी होणार आहे. दिल्ली कॅबिनेटने गुरुवारी डिझेलवर व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (व्हॅट) दर सध्याच्या 30 टक्क्यांपेक्ष कमी करुन 16.75 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने मेमध्ये डिझेलवर व्हॅट वाढवला होता.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, व्हॅट कमी झाल्याने दिल्लीमध्ये डिझेलच्या किंमती 82 रुपये प्रति लिटरवरुन कमी होऊन 73.64 प्रति लीटर होतील. अशा प्रकारे दिल्लीमध्ये डिझेल प्रति लिटर जवळपास 8.36 रुपयांनी स्वस्त होणार आहे.

पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकार व्हॅट तर केंद्र सरकार उत्पाद शुल्क लावते
राज्य सरकार डिझेलवर आणि पेट्रोलवर व्हॅट लावत असते. तर केंद्र सरकार या दोन्ही इंधनांवर उत्पाद शुल्क लावते. केंद्र सरकारनेही मे महिन्यात आपल्या उत्पादन शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. दिल्लीमध्ये डिझेलची किंमत सध्या 81.94 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलची किंमत 80.43 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल डिझेलवर लागत नाही जीएसटी
देशात पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागत नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलची किरकोळ किंमत आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या किंमती आणि इतर देशांच्या परिस्थितीवर अवलंबून असते. याशिवाय पेट्रोल व डिझेलच्या किंमतींमध्ये उत्पाद शुल्क, व्हॅट, विपणन खर्च, मार्जिन, डीलर कमिशन इत्यादींचा समावेश आहे.

आधारभूत किंमतीपेक्षा तीन पटींनी डिझेल विकले जात आहे

16 जुलै रोजी दिल्लीमध्ये डिझेलच्या किंमतीच्या 2.95 पट दराने विक्री होत होती. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी डिझेलची आधारभूत किंमत 27.52 रुपये प्रति लिटर होती. तर पंपवरील किरकोळ किंमत दिल्लीत प्रतिलिटर 81.18 रुपये होती.