आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे नवीन वर्षाचे स्वागत सुरू असताना दिल्लीतील एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दिल्लीतील कांझावाला भागात 31 डिसेंबरच्या रात्री कारमधून आलेल्या काही तरुणांनी एका स्कूटीस्वार तरुणीला धडक दिली. अपघातानंतर तरुणांनी कारसह पळ काढण्यास सुरुवात केली. मुलगी गाडीखाली अडकली आणि सुमारे 12 किलोमीटर रस्त्यावर फरफटत राहीली. ती पूर्णपणे रक्तबंबाळ झाली होती. तर रस्त्यावर फरफटत गेल्याने तिचे कपडेही फाटले. रक्तबंबाळ झालेली मुलगी रस्त्यावर पडून तिचा मृत्यू झाला.
पाच आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी
सोमवारी आरोपींना रोहिणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाच आरोपी मनोज मित्तल, दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा आणि मिथुन यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाच्या आमदार आणि दिल्लीच्या उपसभापती राखी बिर्लान यांनी दिव्य मराठी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, आरोपी भाजपशी संबंधित आहेत. त्यामुळे पोलीस त्यांना संरक्षण देत आहेत. भाजपच्या दबावाखाली पोलिस काम करत आहेत. ही कोणती पद्धत आहे. मुलीचा मृतदेह कुटुंबीयांना का दाखवला जात नाही, असा आरोप देखील त्यांनी केला.
आई म्हणाली- हा कसला अपघात, ही तर हत्या
20 वर्षीय तरुणीला सुमारे 12 किमी रस्त्यावर ओढून नेल्याप्रकरणी मृत्यू झाला आहे. असा पोलिसांनी केलेल्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा एक जीवघेणा अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, मात्र कुटुंबीय याला खूनाचा प्रकार असल्याचे सांगत आहे. पीडितेच्या आईचे म्हणणे आहे की, तिने अंगावर एवढे कपडे घातलेले होते. मग, जेव्हा तिचा मृतदेह सापडला तेव्हा ती पूर्णपणे निर्वस्त्र होती. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. हा कसला अपघात आहे.?
दिल्लीचे डीसीपी हरेंद्रसिंह यांनी सांगितले की, शनिवार-रविवारच्या मध्यरात्री, पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की, कांझावाला भागात एक मुलगी रस्त्याच्या कडेला विवस्त्र अवस्थेत पडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, मुलीचा मृतदेह पडलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी 5 तरुणांना अटक केली आहे. गाडीही जप्त करण्यात आली आहे.
घासल्यामुळे हाडे तुटली, मांस बाहेर आले
सीसीटीव्हीत मिळालेल्या फुटेज समोर आले आहे. त्यामध्ये मुलगी गाडीखाली फरफटतांना दिसली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार मुलीला 12KM पर्यंत कारमध्ये फरफटत नेण्यात आले होते. ओढत नेल्यामुळे मुलीच्या पाठीची व डोक्याची हाड तुटली गेली तिच्या शरीराचे मांस निघाले. दोन्ही पायांची हाडंही तुटली यात तिचा वेदनादायी मृत्यू झाला. जेव्हा मृतदेह रस्त्यावर पडलेला दिसून आला तेव्हा ती तिच्या अंगावर एकही कपडा राहीला नव्हता.
या प्रकरणातील आजचे मोठे अपडेट्स
फोटोतून पाहा आजचे अपडेट्स
आई म्हणाली- माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व होती
मुलीची आई म्हणाली- माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व होती. ती काल पंजाबी बागेत कामावर गेली होती. ती सायंकाळी साडेपाच वाजता घरातून निघाली आणि रात्री दहा वाजेपर्यंत परत येईल असे तिने मला सांगितले होते. त्याच्या अपघाताविषयी सांगण्यात आले पण अजूनही मला तिचा मृतदेह दाखविण्यात आला नाही.
12 किमीपर्यंत नेले फरपटत
23 वर्षीय तरुणी आपल्या स्कूटीवरून घरी जात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचवेळी एका कारमधील पाच मुले तिथून जात होती. मुलीच्या स्कूटीचा त्यांच्या कारला अपघात झाला. अपघातानंतर मुलीला जखमी अवस्थेत सुलतानपूर ते कंझावाला परिसरात सुमारे12 किलोमीटरपर्यंत फरपटत नेण्यात आले. यातच तिचा मृत्यू झाला.
आरोपीची वैद्यकीय चाचणी
पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. कारही ताब्यात घेण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दारूच्या नशेत होते की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. सध्या पोलिसांना या घटनेशी संबंधित कोणतेही सीसीटीव्ही मिळालेले नाहीत.
स्वाती मालीवाल म्हणाल्या - सत्य समोर आले पाहिजे
याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले- 'दिल्लीच्या कंझावाला येथे एका मुलीचा विवस्त्र मृतदेह सापडला होता. असे सांगितले जात आहे की मद्यधुंद अवस्थेत काही मुलांनी तिच्या स्कूटीला कारने धडक दिली आणि तिला अनेक किलोमीटरपर्यंत ओढून नेले. हे प्रकरण अतिशय धोकादायक आहे, मी दिल्ली पोलिसांना हजेरीचे समन्स बजावत आहे. संपूर्ण सत्य समोर आले पाहिजे. यासोबतच त्यांनी नववर्षासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या तयारीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रत्यक्षदर्शीचा दावा - बेगमपूरापर्यंत गाडीचा पाठलाग केला
पीसीआर व्हॅनला अपघाताची माहिती देऊनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा एका प्रत्यक्षदर्शी दीपक यांनी केला आहे. दीपक नावाच्या व्यक्तीने इंडिया टुडेला सांगितले की, तो पहाटे 3.15 वाजता दूध वितरणासाठी जात होता. तेव्हा त्याने कार महिलेला फरफटत नेत असल्याचे पाहीले. दीपकने बेगमपूरपर्यंत बलेनो कारचा पाठलाग केला. दरम्यान दीपकने पोलिसांना फोन केला, मात्र पहाटे पाचपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पीसीआर व्हॅनमधील पोलिसांना संवेदना नसल्याने त्यांनी कारवाई करण्यास कोणताही सहकार्य केले नाही. असे दीपकने सांगितले.
आता जाणून घ्या कोण होती ती मुलगी
रेखा असे पीडित मुलीचे नाव आहे. ती अमन विहारमध्ये राहते. आई आणि दोन भाऊ आणि चार बहिणी असा परिवार आहे. ती घरातील एकमेव कमावती मुलगी होती. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करत होती. नवीन वर्षाच्या एका कार्यक्रमात कामासाठी घरून निघाले होती. शनिवारी-रविवार रात्री अशाच एका कार्यक्रमातून ती परतत असल्याचे सांगण्यात येत आहे. ती स्कूटीने घरी जात होती. त्याचवेळी पाच आरोपी तरुणही त्यांच्या बलेनो कारमधून त्याच मार्गावरून जात होते.
पोलिस तपासावर कुटुंब समाधानी नाही, म्हणाले- निर्भयासारखे प्रकरण
कुटुंबीय म्हणाले- हे बलात्कारानंतर खूनाचे प्रकरण आहे. त्याचे कपडे असेच फाडता येत नाहीत. ती सापडली तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. आम्हाला या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी. पीडित मुलीचे मामा प्रेमसिंह म्हणाले की, हे प्रकरण निर्भयासारखे वाटू लागले आहे. आम्हाला न्याय हवा आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.
पोलिसांचा दावा- हा फक्त एक अपघात
डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, कांझावाला परिसर रोहिणी जिल्ह्यातील आहे. एक कार एका मुलीला गाडीसह फरफटत नेत असल्याचा फोन पोलिसांना आला होता. त्यावर तिथल्या पोलिसांनी गाडीचा नंबर पडताळला. यानंतर कार स्वारांना अटक करण्यात आली. चौकशीत सुलतानपूर परिसरात स्कूटीसोबत अपघात झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये तरुणीला गाडीसह ओढत नेत राहिले. हे संपूर्ण प्रकरण अपघाताचे आहे. अपघातामुळे मुलीचे शरीराला दुखापत झाली. रक्तस्त्राव झाला. हा लैंगिक अत्याचार किंवा खून असल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पसरली. हे पूर्णपणे चुकीचे आहे.
आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असून पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. कारही ताब्यात घेण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दारूच्या नशेत होते की नाही हे तपासण्यासाठी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत.
एलजी म्हणाले - माझी मान शरमेने झुकली
या घटनेवर दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी ट्विट केले आहे. या गुन्ह्यामुळे माझी मान शरमेने झुकत आहे. गुन्हेगारांच्या राक्षसी असंवेदनशीलतेने मला धक्का बसला आहे. सर्व आरोपी पकडले गेले आहेत. पीडित कुटुंबाला शक्य ती सर्व मदत केली जाईल. दिल्लीच्या पोलिस आयुक्तांसह ते या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.