आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील कांझावाला हिट अँड रन प्रकरणात दिल्ली पोलिसांनी नवा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, कारने 12 KM फरफटत नेलेल्या तरुणीसोबत तिची मैत्रिणी देखील स्कूटीवर होती.
कार धडकेनंतर मृत झालेली तरूणी कारमध्ये अडकली, पण परंतू अपघाताच्या वेळी तिची मैत्रीण देखील स्कूटीवर होती. ती घटनास्थळावरून निघून गेली. तिला देखील किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिस आज तिचा जबाब नोंदवणार आहेत.
दिल्लीतील कांझावाला भागात 31 डिसेंबरच्या पहाटे 2 वाजेच्या सुमारास एका 20 वर्षीय तरुणीला कारमधून आलेल्या पाच तरुणांनी धडक दिली. अपघातानंतर तरुणांनी कारसह पळ काढला. मुलगी गाडीखाली अडकली आणि सुमारे 12 किलोमीटर रस्त्यावर फरफटत नेण्यात आली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी पाचही तरुणांना अटक केली. दरम्यान, मृत तरुणीवर आज अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. तसेच आरोपींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, जेणेकरून ते नशेत होते की नाही हे समजू शकेल.
एफआयआरमध्ये अपघाताची संपूर्ण कहाणी...
अमित शहा यांनी अहवाल मागवला
सोमवारी सायंकाळी गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाचा तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या महिला अधिकारी शालिनीसिंह करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने शालिनी सिंह यांना लवकरच अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
पाचही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी
सोमवारी आरोपींना रोहिणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पाच आरोपी मनोज मित्तल, दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा आणि मिथुन यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी दीपक खन्ना कार चालवत होते. त्यापैकी मनोज मित्तल हे भाजपचे नेते असल्याचे बोलले जात आहे.
पोलिस आरोपींना आणून क्राइम सीन रिक्रिएट करणार
दिल्ली पोलिसांचे विशेष सीपी डॉ. सागर पी हुड्डा यांनी सांगितले की, वैद्यकीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांची अनेक पथकेही तपासात गुंतली आहेत. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलिस क्राईम सीन रिक्रिएट करणार असल्याचे सांगितले जात आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत.
सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुराव्याच्या आधारे टाइमलाइन तयार केली जाईल. त्यानुसार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे आरोपींविरुद्ध आणखी कलमे जोडली जातील. सायंकाळी तरुणीचा मृतदेह मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. सुमारे दीड तास तिचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.
आरोपी भाजप कार्यकर्ते असल्याचा आप चा दावा
आम आदमी पक्षाच्या आमदार आणि दिल्लीचे उपसभापती राखी बिर्लान यांनी दिव्य मराठीशी संवाद साधताना सांगितले की, आरोपी भाजपशी संबंधित आहे. त्यामुळे पोलीस त्यांना संरक्षण देत आहेत. भाजपच्या दबावाखाली पोलिस काम करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
यासंबंधित अन्य बातम्या वाचा
कारने मुलीला 12KM फरफटले, मृत्यू VIDEO:'आप' MLA म्हणाल्या- आरोपी भाजप कार्यकर्ता; कोर्टाने 5 आरोपींना 3 दिवसांची कोठडी सुनावली
एकीकडे नवीन वर्षाचे स्वागत सुरू असताना दिल्लीतील एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. दिल्लीतील कांझावाला भागात 31 डिसेंबरच्या रात्री कारमधून आलेल्या काही तरुणांनी एका स्कूटीस्वार तरुणीला धडक दिली. अपघातानंतर तरुणांनी कारसह पळ काढण्यास सुरुवात केली. मुलगी गाडीखाली अडकली आणि सुमारे 12 किलोमीटर रस्त्यावर फरफटत राहीली. रक्तबंबाळ झालेली मुलगी रस्त्यावर पडून तिचा मृत्यू झाला. परंतू या घटनेत अनेक खुलासे केले जात आहेत. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.