आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Chhawla Gangrape Convicts Released, Supreme Court Overturns High Court Decision, HC Awarded Death Sentence

दिल्लीतील छावला गँगरपेच्या दोषींची सुटका:सुप्रीम कोर्टाने रद्द केला हायकोर्टाचा निर्णय, HC ने दिली होती फाशीची शिक्षा

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील छावला येथे 2012 मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारातील दोषींची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालय आणि उच्च न्यायालयाने रवी कुमार, राहुल आणि विनोद यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांच्या खंडपीठाने हा निर्णय रद्द केला.

14 फेब्रुवारी 2012 रोजी छावला येथे उत्तराखंडमधील एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. आरोपींनी तिला गाडीत बसवून दिल्लीबाहेर नेले होते. सामूहिक बलात्कारादरम्यान मुलीवर अमानुष अत्याचारही झाले होते. तिच्या अंगाला सिगारेटचे चटके देण्यात आले आणि चेहऱ्यावर अॅसिड टाकण्यात आले. ट्रायल कोर्टाने रवी, राहुल आणि विनोद यांना मुलीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. उच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

काय होते प्रकरण, आतापर्यंत काय-काय घडले?

अनामिका (बदललेले नाव) 9 फेब्रुवारी 2012 रोजी रात्री नोकरीवरून परतत असताना आरोपींनी तिचे अपहरण केले होती. 14 फेब्रुवारीला अनामिकाचा मृतदेह हरियाणातील रेवाडी येथे सापडला होता. गँगरेपनंतर आरोपींनी तिची हत्या केली होती. तिच्या डोळ्यात अॅसिड टाकण्यात आले होते. याप्रकरणी राहुल, रवी आणि विनोद नावाच्या आरोपींना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयाने 2014 मध्ये तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती, हे दुर्मिळ प्रकरण असल्याचेही म्हटले होते.

नंतर दिल्ली उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. CJI म्हणाले होते की, भावना पाहून शिक्षा होऊ शकत नाही, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पीडितेच्या वडिलांनी या प्रकरणातील दोषींना फाशी दिली पाहिजे असे म्हटले होते. यावर CJI लळीत म्हणाले होते की, शिक्षा तर्क आणि पुराव्याच्या आधारे दिली जाते. तुमच्या भावना आम्ही समजून घेत आहोत, मात्र कोर्टात भावना पाहून निर्णय घेतला जात नाही.

बातम्या आणखी आहेत...