आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केजरीवाल आजारी:दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारपासून आजारी, सेल्फ क्वारंटाइन; मंगळवारी केली जाणार कोरोनाची चाचणी

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केजरीवाल यांनी रविवारीच रुग्णालयांचे दोन भागांत विभाजन केले आ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रविवारी दुपारपासूनच आजारी आहेत. त्यामुळे, त्यांनी दुपारपासूनच आपल्या सर्व बैठका आणि कार्यक्रम रद्द केले. आजाराची लक्षणे दिसताच त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. डॉक्टरांनी त्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, मंगळवारी त्यांची कोरोनाची टेस्ट घेतली जाणार आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले आहे. रविवारपासून त्यांनी कुणाचीही भेट घेतली नाही.

अरविंद केजरीवाल यांनी रविवारीच रुग्णालयांचे दोन भागांत विभाजन केले आहे. त्यानुसार, दिल्लीत केवळ केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्येच दिल्लीच्या बाहेरून असलेल्या लोकांवर उपचार केले जातील. तर उर्वरीत सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर उपचार होणार आहेत. हा निर्णय घेण्यापूर्वी केजरीवाल यांनी दिल्लीकरांचा सल्ला घेतला होता असे राज्य सरकारच्या वतीने सांगितले जात आहे. दरम्यान, दिल्लीत एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या 27,654 झाली आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 1320 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे दिल्लीत 761 जण दगावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...