आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत 18+ चे लसीकरण बंद:CM केजरीवाल यांनी मोदी सरकारला धरले जबाबदार, म्हणाले- महिन्याला 80 लाख डोसची गरज, मिळाले फक्त 16 लाख डोस

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केजरीवाल यांनी मोदी सरकारला दिल्या 4 सुचना

देशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसरीकडे अनेक राज्यांत लसीकरणाची मोहीम थंड बस्त्यात पडली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने आजपासून 18 ते 44 वयोगातील लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, त्यांनी लसीकरणाच्या तुटवड्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला असून या परिस्थितीस ते जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

केजरीवाल पुढे बोलताना म्हणाले की, दिल्लीला प्रत्येक महिन्याला 80 लाख डोसची गरज असून केंद्र सरकारकडून फक्त 16 लाख डोस मिळत आहे. त्यामुळे शनिवारी अनेक केंद्रावरील लसींचा साठा समाप्त झाला आहे. लसींच्या कमतरतेमुळे आज शनिवारपासून 18 वर्षांवरील लसीकरण बंद केले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

केजरीवाल यांनी मोदी सरकारला दिल्या 4 सुचना

1. लस उत्पादक कंपन्यांना दुसऱ्या कंपन्यांसोबत फॉर्म्युला शेअर करण्याचा आदेश दिला जावा.

2. सर्व परदेशी लसींना वापरण्यास त्वरित परवानगी दिली पाहिजे.

3. ज्या देशांजवळ गरजेपेक्षा जास्त पुरवठा आहे. त्यांच्याजवळून लस आयात करायला हवी.

4. दुसऱ्या देशातील लस उत्पादक कंपन्यांना भारतात लस तयार करण्याची परवानगी द्यावी

बातम्या आणखी आहेत...