आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi CM Arvind Kejriwal On Narendra Modi And LG VK Saxena, Latest News And Update

उपराज्यपाल बायकोहून जास्त टोमणे मारतात:केजरीवाल म्हणाले - सुपर बॉसच्या इशाऱ्यावर काम करत आहेत दिल्लीचे LG

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरूवारी उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. ते एका ट्विटद्वारे म्हणाले - उपराज्यपाल रोज मला माझ्या पत्नीपेक्षा जास्त टोमणे मारतात. मागील 6 महिन्यांत त्यांनी मला जेवढे प्रेमपत्र पाठवले, तेवढे लव्ह लेटर तर माझ्या पत्नीनेही मला पाठवले नाही.

केजरीवाल म्हणाले - LG साहेब, थोडे शांत व्हा

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले की, उपराज्यपाल साहेब, थोडे शांत व्हा व आपल्या सुपर बॉसलाही थोडे शांत होण्यास सांगा. केजरीवालांनी आतापर्यंत अनेकदा उपराज्यपालांवर केंद्राच्या इशाऱ्यानुसार काम करून दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारला कोंडीत पकडण्याचा आरोप केला आहे.

LG च्या या पत्रामुळे केजरीवाल नाराज

काही दिवसांपूर्वीच एलजी व्ही के सक्सेना यांनी केजरीवालांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी गांधी जयंतीच्या दिवशी केजरीवाल किंवा त्यांच्या मंत्रीमंडळातील कोणताही मंत्री राजघाट किंवा विजय घाटावर गेला नसल्याची खंत व्यक्त केली होती. सक्सेना यांनी हे प्रोटोकॉलचे उल्लंघन असल्याचा आरोप केला होता.

पत्रात लिहिले होते की, अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन दिल्ली सरकारतर्फे केले जाते. कार्यक्रमाच्या पाहुण्यांना जे निमंत्रण पाठवले जाते, ते दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने जाते. त्यामुळे मुख्यमंत्री किंवा एखाद्या मंत्र्याने गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या समाधीस्थळी न जाणे चुकीचे आहे.

मद्य धोरणातील कथिक घोटाळ्यामुळे वाद

व्ही के सक्सेना यांनी दिल्लीच्या नव्या मद्य धोरणातील कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे घर व बँक लॉकरवर छापेमारी केली होती. या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) एकाचवेळी 6 राज्यांतील 40 ठिकाणी छापेमारी केली होती.

1 ऑगस्ट रोजी लागू झाले जुने मद्य धोरण

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी 1 ऑगस्ट 2022 रोजी जुने मद्य धोरण लागू करण्याची घोषणा केली होती. ते एका पत्रकार परिषदेत म्हणाले - केंद्राने या धोरणात सीबीआयचा प्रवेश केल्यामुळे कुणीही ठेका घेण्यास तयार नाही. त्यामुळे सरकार नवे धोरण लागू करणार नाही.

नव्या एक्साइज धोरणामुळे भाजपचा भ्रष्टाचार संपुष्टात आला असता. तसेच सरकारी तिजोरीत 9500 कोटींचा अतिरिक्त महसूल गोळा झाला असता. सद्यस्थितीत दिल्लीत 468 दारु दुकाने सुरू असून, राजधानीत अवैध दारू विक्री व्हावी हा भाजपचा हेतू आहे, असे ते म्हणाले होते.

नव्या धोरणाविषयीचे दिल्ली सरकारचे 5 प्रमुख निर्णय...

  • संपूर्ण दिल्लीची 32 झोनमध्ये विभागणी करून प्रत्येक झोनमध्ये 27 लिकर व्हेंडर ठेवणे.
  • यात दिल्ली सरकार यापुढे मद्यविक्री करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
  • आता दिल्लीत मद्यविक्री केवळ खासगी विक्रेत्यांकडून होईल.
  • प्रत्येक वॉर्डात 2 ते 3 व्हेंडर्सना दारू विक्रीची परवानगी दिली जाईल.
  • मद्यविक्रीच्या दुकानांना परवाना देण्याची प्रक्रिया सोपी व लवचिक केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...