आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Corona Outbreak: Chief Minister Arvind Kejriwal Declared Less Than 100 ICU Beds In Delhi; News And Live Updates

कोरोना महामारीचा परिणाम:दिल्लीत 100 हून कमी आयसीयू बेड शिल्लक : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत राजधानीतील विदारक चित्र मांडले

दिल्लीतील पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयातही उपचारासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. एवढेच नव्हे तर केवळ १०० आयसीयू बेड राहिले आहेत, अशा शब्दांत रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत राजधानीतील विदारक चित्र मांडले. दिल्ली सरकारने केंद्राकडे अतिरिक्त आॅक्सिजनच्या पुरवठ्यासाठी मागणी केली आहे. त्याचबराेबर पुरेशा खाटांची देखील व्यवस्था करून देण्याची आम्ही विनंती केली आहे. दिल्लीत सध्या १०० हून कमी आयसीयू बेड राहिले आहेत.

सकाळीच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझे बाेलणे झाले आहे. आम्ही सातत्याने परस्परांच्या संपर्कात आहाेत. दिल्लीत केंद्राने ७ ते १० हजार खाटांची व्यवस्था करून द्यायला हवी आणि आॅक्सिजन रुग्णांना तातडीने मिळायला हवे, असे केजरीवाल यांनी सांगितले. यमुना स्पाेर्ट््स काॅम्प्लेक्स, राधास्वामी सत्संग परिसरात आणि शाळांमधून लवकरच ६ हजारावर खाटा उपलब्ध करून दिल्या जातील. दिल्ली सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या दाेन-तीन दिवसांत ही व्यवस्था हाेईल.

बातम्या आणखी आहेत...