आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Corona Outbreak: There Is No Oxygen Bed In The Delhi; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राऊंड रिपोर्ट:देशाच्या आर्थिक राजधानीत ऑक्सिजन बेड नाही, रस्त्यांवर फिरताहेत बाधित

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मुंबई, यूपीतील गाझियाबाद, दिल्लीहून आंखो देखा हाल...

मुंबई उपनगरातील मालाड (पूर्व) येथील बचानीनगरातील ८४ वर्षांचे मुरलीधर बाबूधर खत्री कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कुटुंबीयांच्या माहितीवरून मनपा वॉर रूममधून रुग्णवाहिका आली. त्यांना घेऊन दहिसर चेकनाक्यावरील कोविड सेंटरला गेली असता खाट नव्हती. खत्री यांच्यासोबत आलेले त्यांचे भाऊ आणि जावयाने त्यांना आता कोठे न्यायचे, असे विचारले. त्यांच्यासोबत असल्याने त्यांनाही संसर्गाची भीती होती. ते सांगतात, रविवारी रात्रीपासून फोन करून करून पूर्ण कुटुंब थकले आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनामुळे स्थिती किती वाईट आहे हे यावरून दिसते. स्थिती अशी आहे की, दहिसर चेकनाका येथील कोविड सेंटरच्या ज्या प्रवेशद्वारातून रुग्ण दाखल होतात, तेथे खुर्चीवर एक बाधित महिला दिसली. तिला ऑक्सिजन लावण्यात आला होता आणि जवळ सिलिंडर होता. बेड नसल्याने महिलेवर खुर्चीवर उपचार सुरू होते.

दहिसर चेकनाक्याच्या कोविड सेंटरबाहेर ६४ वर्षांचे हृदय व मधुमेहाचे रुग्ण गौरीशंकर भट्टी यांची मुलगी भेटली. तिने सांगितले, आम्ही जवळपासच्या चार रुग्णालयांत जाऊन आलो. मात्र कोठेच ऑक्सिजन मिळाला नाही. आता कोविड सेंटरचे कर्मचारी सांगताहेत जे करायचे ते करा. येथे बेड नाही. गरज असेल तर बाहेर बेडची व्यवस्था करून घ्या. भट्ट यांना श्वसनाचा त्रास होत आहे. मुंबईत रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. यासाठी जेवढी मनपा जबाबदार आहे त्यापेक्षा जास्त येथील लोक आहेत. मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह खुलेआम फिरत आहेत. मीरा रोड भागातील उमेश बाधित असूनही अहवाल घेण्यासाठी दहिसर कोविड सेंटरवर बाइकवरून गेला. अहवाल देत नसल्याचे त्याने सांगितले. संतोष घाडीगावकर यांची सासू इंदुवती गुरव ७५ वर्षांची आहे. फेऱ्या मारूनही बेड मिळाला नाही.

बातम्या आणखी आहेत...