आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिल्ली कोरोना:चाचणीसाठी 50% कमी खर्च येईल, भाजपच्या मागणीला अमित शाहांची मंजुरी; काँग्रेसच्या मागणीवर सर्वांना तपासणीचा अधिकार देण्याचे आश्वासन दिले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गृह मंत्रालयात झालेल्या बैठकीला आप, कॉंग्रेस, भाजप आणि बसपाचे नेते उपस्थित होते.
  • शाह म्हणाले- दिल्ली सरकार 20 जूनपर्यंत दररोज 18 हजार चाचण्या करण्यास सुरुवात करेल
  • कोरोना रुग्णांच्या चुकीच्या व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिल्ली सरकारला फटकारले

दिल्लीतील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश कुमार गुप्ता यांनी सांगितले की, चाचणीच्या खर्चात 50% सूट देण्याची भाजपची मागणीला गृहमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. भाजपने सुचना दिली की, खासगी रुग्णालयातील दर निश्चित केले जावे. यावर शाह यांनी एक कमेटी तयार करत 2 दिवसांत रिपोर्ट मागवला आहे. 

प्रत्येकाला चाचणी अधिकार देण्याची दिली ग्वाही

दिल्ली कांग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला चाचणीचा अधिकार मिळाला पाहिजे. असे केल्यानेच उपचार शक्य आहे. गृहमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे. नवीन धोरणात प्रत्येक व्यक्तीला चाचणी करण्याचा अधिकार देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

20 जूनपर्यंत दिल्ली सरकार दररोज 18,000 चाचण्या करण्यास सुरुवात करेल, असेही शहा म्हणाले. सध्या दररोज 5 हजार ते 7 हजार चाचण्या होत आहेत. दीड तास चाललेल्या सर्वपक्षीय बैठकीला आप, कॉंग्रेस, भाजपा आणि बसपाचे नेते उपस्थित होते

काँग्रेसने देखील या 2 मागण्या केल्या 

1. जे लोक संक्रमित आहेत किंवा कंटेनमेंट झोनमध्ये आहेत, त्यांच्या कुटुंबियांना 10-10 हजार रुपये द्यावे.

2. चतुर्थ वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना नॉन-परमानंट निवासी डॉक्टरप्रमाणे मानावे. आरोग्य सेवा कर्मचार्‍यांची कमतरता लक्षात घेता चतुर्थ वर्षाच्या फार्मसी किंवा नर्सिंग विद्यार्थ्यांकडून काम करवून घ्यावे.

शहा यांनी मोर्चा सांभाळला, केजरीवाल बॅक सीटवर

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दिल्ली सरकारला फटकारले होते. कोर्टाने म्हटले की, रुग्णांचे मृतदेह कचऱ्यात सापडत असतील, तर माणसांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिली जात आहे. कोर्टाच्या या कमेंटा असा परिणाम झाला की, केंद्रीय गृह मंत्री अमित शाहंनी स्वःता मोर्चा आपल्या हातात घेतला आहे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता बॅक सीटवर दिसत आहेत.

शाह-केजरीवालच्या मीटिंगमधील 4 महत्वपूर्ण निर्णय

न्यूज एजेंसीच्या सूत्रांनुसार, आजच्या बैठकत काँग्रेस, भाजप, आप आणि बसपाचे नेते सामील होते. दिल्ली आणि केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारीदेखील सामील होती. यापूर्वी रविवारी अमित शाहंची केजरीवालसोबत बैठकीत 4 महत्वपूर्ण निर्णय घेतले.

1. कोरोना टेस्टिंगचा रेट परत ठरवला जाईल. यासाठी बनवलेल्या कमीटीला आज रिपोर्ट सादर करायची आहे.

2. स्काउट गाइड, एनसीसी, एनएसएस आणि दुसऱ्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या मेंबर्सना हेल्थ वॉलेंटियर बनवले जाईल.

3. अंत्यविधीची नवीन गाइडलाइन जारी केली जाईळ.

4. दिल्लीतील लहान रुग्णालयांच्या मदतीसाठी एम्समध्ये हेल्पलाइन नंबर सुरू.

0