आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात अनलॉक-१नंतर ९ दिवस झाले आहेत. मात्र, या काळात कोरोना रुग्णांचा आलेख चढताच आहे. दिल्लीत वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकार धास्तावले असून मंगळवारी आपत्ती निवारण प्राधिकरणाची तातडीची बैठक घेण्यात आली. या उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह उपराज्यपाल अनिल बैजल आणि केंद्र सरकारचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर सिसोदिया म्हणाले, याच गतीने रुग्ण वाढत राहले तर ३१ जुलैपर्यंत ८० हजार बेडची व्यवस्था करावी लागणार आहे. कारण, तोवर रुग्णांची संख्या ५ लाखांच्या वर गेलेली असेल. दिल्लीच्या उपराज्यपालांनी राजधानीत केवळ याच भागातील रुग्णांवर उपचार केले जातील, हा राज्य सरकारने घेतलेला निर्णय रद्दबातल ठरवला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही भीती व्यक्त केली आहे. दिल्लीत आतापर्यंत २९,९४३ रुग्ण असून आतापर्यंत ८७४ मृत्यू झाले आहेत.
दिल्ली सरकारचा दावा वास्तव की राजकारण?
ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत ते प्रमाण पाहता ३१ जुलैपर्यंत राजधानीत साडेपाच लाख रुग्ण होतील. हा वेग पाहता ३० जूनपर्यंत रुग्णांची ही संख्या १ लाखाचा टप्पा गाठू शकते. या स्थितीत दिल्लीत उपचारासाठी किमान १५ हजार बेड लागतील. याच गतीने रुग्ण वाढत राहले तर ३१ जुलैपर्यंत ८० हजार बेडची व्यवस्था करावी लागणार आहे. दिल्लीत सामूहिक संसर्ग झाला आहे. मात्र, केंद्रीय अधिकाऱ्यांच्या मते,दिल्लीत सामूहिक संसर्ग झालेला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.