आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Coronavirus Third Wave Warning By IIT Scientists | Indian Institute Of Technology On COVID Cases Forecast; News And Live Updates

कोरोनावर IIT दिल्लीचा इशारा:दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट धोकादायक होण्याची भीती; दररोज 45 हजार प्रकरणे आणि 9 हजार लोकांना रुग्णालयाची आवश्यकता

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीत गेल्या 24 तासांत म्हणजे शुक्रवारी 1 हजार 141 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

देशातील काही राज्यात कोरोनाचे नवीन रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे. राजधानी दिल्लीत सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु, आयआयटी दिल्लीने एक रिपोर्ट जारी करत केजरीवाल सरकार आणि केंद्र सरकारच्या चिंतेत वाढ केली आहे. रिपोर्टनुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राजधानी दिल्लीत दररोज 45 हजार प्रकरणे समोर येतील. त्याचबरोबर एका दिवसात 9 हजार लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. या रिपोर्टमुळे दिल्ली सरकारसह आरोग्य व्यवस्था आणि सर्वसामान्य लोकही चिंतेत सापडले आहे. कारण कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रनेवर प्रचंड ताण आलेले आहे.

3 घटकांच्या आधारे तयार केला अहवाल
आयआयटी दिल्लीने रिव्ह्यू अँड रिकमेंडेशन फॉर मॅनेजमेंट ऑफ ऑक्सिजन ड्यूरिंग कोविड क्राइसिस फॉर GNCTD नामाच्या रिपोर्ट तीन घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. पहिल्या घटकांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती कायम राहल्यास रुग्णांची संख्या, हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि ऑक्सिजनची गरज यांचा अंदाज लावला आहे. दुसऱ्या घटकांमध्ये परिस्थिती 30% ने वाढणार्‍या नवीन प्रकरणांच्या गरजेवर आधारित आहे. तर तिसऱ्या घटकांत कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा 60% ने वाढ झाल्यावर आहे. या परिस्थितीत दिल्लीत दररोज 45 हजाराहून अधिक केसेसचा अंदाज लावला जात आहे.

दररोज 944 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या या महामारी मात करण्यासाठी दिल्ली शहराला दररोज 944 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता असेल.

दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात
राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत म्हणजे शुक्रवारी 1 हजार 141 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये 2 हजार 799 लोक बरे झाले असून 139 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत आतापर्यंत 14.23 लाख लोक कोरोनाच्या विळाख्यात आले असून यामध्ये 13.85 लाख बरे झाले आहेत, तर 23 हजार 951 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 14 हजार 581 लोकांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...