आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीची गोळी झाडून हत्या:दिल्लीतील हॉटेलमध्ये दोघांमध्ये भांडण, स्वतःवरही झाडली गोळी, थरकाप उडवणारी घटना

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील एका हॉटेलमध्ये विवाहित तरुणाने आपल्या प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण मंगळवारी नरेला येथील आहे. या दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. प्रेयसीवर गोळी झाडल्यानंतर तरुणाने स्वत:वरही गोळी झाडली. या गोळीबाराच्या घटनेनंतर हॉटेलच्या आवारात खळबळ उडाली. ..

मीडिया रिपोर्ट्सनुसार हॉटेल कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोघेही आरोपी प्रवीण उर्फ ​​सिटू (38) आणि त्याची 39 वर्षीय मैत्रीण एकत्र हॉटेलमध्ये आले होते. दोघांमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला. यामुळे रागाच्या भरात प्रवीणने तिच्या छातीत गोळी झाडली. यानंतर त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही संजय गांधी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. आरोपीवर उपचार सुरू आहेत.

आरोपीची पत्नी मुलांसह गावात राहते
पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रवीणची सुशीला नावाची पत्नी असून ती आपल्या मुलांसह गावात राहते. आरोपीने एखाद्यावर गोळ्या झाडल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 21 सप्टेंबर रोजी त्याने गौरव नावाच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. मात्र, नंतर तो जामीन घेऊन तुरुंगातून बाहेर आला होता. पोलिसांनी प्रवीणच्या नातेवाईकांची चौकशी करून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.

श्रद्धाने 2 वर्षांपूर्वी सांगितले होते, आफताब मारून टाकेल

श्रद्धा हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. बुधवारी आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांकडे आफताबच्या हिंसक वागणुकीची तक्रार केली होती. अशी माहिती माध्यमांद्वारे सांगितली जात आहे. येथे वाचा पुर्ण बातमी

दुसऱ्या धर्मात लग्न करणाऱ्या मुलीवर गोळीबार

जयपूरमध्ये बुधवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी एका तरुणीवर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने मुलगी बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडली. गोळीबारामुळे तेथे गोंधळ उडाला. लोकांनी पोलिसांना माहिती दिली. ही घटना मुरलीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...