आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीत एका व्यक्तीने चाकूने स्वत:चा गळा चिरला. त्यानंतर चाकू आणि पिस्तुल घेऊन रस्त्यावर पळू लागला आणि त्याने लोकांनाही घाबरवले. यावेळी त्याला रोखण्यासाठी पोलीसही उपस्थित होते, मात्र त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. ही घटना 16 मार्च रोजी नथू कॉलनी चौकाजवळ घडली होती, त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
पोलिस म्हणाले- घटनेची माहिती देण्यासाठी PCRवर आले दोन कॉल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा शेरवाल असे या व्यक्तीचे नाव असून तो सध्या गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. 16 मार्च रोजी एमएस पार्क पोलिस स्टेशनला संध्याकाळी 6:40 आणि 6:50 वाजता दोन पीसीआर कॉल आले होते. नथू कॉलनी चौकाजवळ एक व्यक्ती स्वत:चा गळा चिरून चाकू घेऊन पळत असल्याची माहिती मिळाली होती.
आजूबाजूला लोकांची गर्दीही होती. त्याने गोळीबारही केला. माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावर त्याने पोलिसांच्या दिशेनेही गोळीबार केला. यात एक पोलीस जखमी झाला. मात्र, नंतर या व्यक्तीला नियंत्रणात घेण्यात यश आले.
पत्नी नांदत नाही, आरोपी डिप्रेशनमध्ये
त्याचे पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर त्याला पकडण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 307, 394, 397, 186 आणि 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत शेरवाल आणि त्याची पत्नी वेगळे राहत असल्याचे समोर आले. यामुळे तो बऱ्याच दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.