आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi DDA Market Murder Video Updates । 22 Year Old Killed In Malviya Nagar | Delhi Latest News

दिल्लीमध्ये भरबाजारात तरुणाचा खून, VIDEO:हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याला 5 जणांनी घेरले, दगड मारल्यानंतर चाकूने भोसकले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील मालवीय नगरमध्ये गुरुवारी संध्याकाळी एका हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. मयंक पवार (25) असे मृताचे नाव आहे. डीडीए मार्केटमध्ये 4-5 जणांनी त्याला घेरले आणि चाकूने हल्ला केला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

व्हिडिओमध्ये एक तरुण रस्त्यावर धावताना दिसत आहे. 4 ते 5 जण त्याचा पाठलाग करून त्याला पकडून मारहाण करत होते. यानंतर तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. जमाव मूक बनून सगळं पाहत राहिल्याचे क्लिपमध्ये दिसत आहे. मयंकचा मृत्यू होताच आरोपी फरार झाले. घटनेनंतर मयंकच्या मित्राने लोकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आरोपी मयंकची हत्या करत असताना कोणीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.
आरोपी मयंकची हत्या करत असताना कोणीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.

पाठलाग करत बाजारात पोहोचले होते आरोपी

मयंकच्या मित्राने सांगितले की, दोघेही बेगमपूरमध्ये बसले होते. यादरम्यान त्याचा 4-5 मुलांसोबत काही गोष्टीवरून वाद झाला. काही वेळातच वाद वाढला आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. मयंक आणि त्याचा मित्र जीव वाचवून पळून गेले. आरोपींनी त्यांचा पाठलाग करून डीडीए मार्केट गाठून मयंकला घेरले आणि चाकूने हल्ला केला.

मयंक पवार (फाइल फोटो)
मयंक पवार (फाइल फोटो)

पोलिस म्हणतात- हल्लेखोरांना लवकरच पकडून

घटनेनंतर आरोपी फरार आहेत. त्याचवेळी याप्रकरणी डीसीपी बेनिता मेरी जॅकर यांनी सांगितले की, आरोपींची ओळख पटवली जात आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...