आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स एअरफोर्स अधिकारी आणि त्याच्या पत्नीची आत्महत्या:दिल्लीतील घटना, महिन्याभरापूर्वीच मृत अजयपालांनी दिला होता राजीनामा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीने खोलीत पाहिले की, पती बेशुद्ध अवस्थेत आहे, तोंडातून फेस येत आहे, त्यानंतर पत्नीने पतीला रुग्णालयात नेले जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर पत्नीने घरी येऊन स्वतः विष प्राशन केले. पोलिसांनी दरवाजा तोडून पत्नीला बाहेर काढले तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

वायुसेना अधिकारी अजयपाल (37) आणि त्यांची पत्नी मोनिका (32) यांनी दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनी भागातील हुडको पॅलेसमध्ये आत्महत्या केली. दोघांनी राहत्या घरी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोनिका यांनी राहत्या घरात पती अजयपाल यांना पाहिले. तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. तोंडातून फेस येत होता. त्यानंतर मोनिका यांनी पती अजय यांना रुग्णालयात नेले. जेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. यानंतर पत्नीने घरी येऊन स्वतः विष प्राशन केले. पोलिसांनी दरवाजा तोडून पत्नीला बाहेर काढले तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांना गुरूवारी पहाटे 4.30 वाजता ही माहिती मिळाली. मृत अजयपाल हे एअफफोर्समध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. वर्षभरापूर्वींच दोघांचा विवाह झाला होता.

प्रयागराजमध्ये ही एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली
विशेष म्हणजे बुधवारीच प्रयागराजमधून आत्महत्येची वेदनादायक घटना समोर आली होती. यूपीच्या प्रयागराजमध्ये एका तरुणाने ट्रेनमधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तरुणाने आई-वडिलांची माफी मागताना आत्महत्येचे कारणही दिले आहे. यासोबतच त्याच्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये, असे पोलिसांसाठी लिहिले आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत.

हे ही वाचा

मध्यरात्री वर्गात जाऊन केली आत्महत्या : हैदराबादेत इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचा शिक्षक आणि वॉर्डनवर छळाचा आरोप

हैदराबादेत मंगळवारी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने वर्गातच आत्महत्या केली. तो कॉलेजच्या वसतिगृहात राहायचा. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने शिक्षक आणि वॉर्डन त्याचा छळ करत आणि मारहाण करत असल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा वर्गात गेला व तेथेच त्याने आत्महत्या केली. - येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...