आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Delhi: Doctors And Nurses Stay Away From Ordinary Patients In Government Hospitals For Fear Of Infection

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:दिल्ली : सरकारी रुग्णालयांत संसर्गाच्या भयाने सामान्य रुग्णांपासून डॉक्टर, परिचारिका दूरच

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • एप्रिलमध्ये पहिल्यांदा ९ कंटेनमेंट झोन, आता ही संख्या वाढत जाऊन २४३
 • परिचारिकाही दुरूनच देताहेत सूचना

 लोकनायक रुग्णालयात कोविड-१९ रिसेप्शनवर एक बुजुर्ग भरती होण्यासाठी पोहोचले. तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात का? अशी विचारणा स्टाफने त्यांना केली. होकारार्थी उत्तर मिळाल्यानंतर स्टाफने काही प्रतिक्रिया दिली नाही. कारण त्या वेळी ते तीन रुग्णांना सुटी देण्यासाठी डिस्चार्ज पेपर घेऊन उभे होते. ते वृद्ध समोरील एका रिकाम्या खुर्चीकडे बघून त्याकडे जात होते. परंतु हॉस्पिटलच्या स्टाफने कडक आवाजात त्यांना रोखले. बाबा, तेथे बसू नका. तुम्ही प्रतीक्षा करा. डॉक्टरांना बोलवतोय. तुम्हाला ते भरती करतील. त्यादरम्यान मनजितकौर तेथे पोहोचल्या. वडिलांची कोरोना तपासणी करण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा त्यांना येथे कोरोनाची टेस्ट केली जात नसल्याचे सांगण्यात आले. लोकनायक रुग्णालय दिल्लीत कोरोनावरील उपचार करणारे सर्वात मोठे रुग्णालय आहे. येथे २ हजारांवर खाटांची व्यवस्था आहे. बोर्डावर मात्र सध्या ७०८ रुग्ण भरती असल्याची माहिती मिळते. सातव्या मजल्यावर दाखल शिवसिंह यादव यांच्या कुटुंबीयांनी मोबाइलवर व्हिडिआे संदेशाद्वारे येथील परिस्थिती दाखवली. भरती होऊन तीन दिवस उलटले तरी डॉक्टर त्यांना पाहण्यासाठी आलेले नाहीत. कोणतेही आैषध मिळत नाही. अन्य एका रुग्णाशी बातचीत करत ते म्हणाले, गेल्या दहा दिवसांपासून साफसफाई झालेली नाही. स्वच्छता थातूरमातूर पद्धतीने केली जाते. बाथरूममध्ये पाणी नाही. बाटल्यांतून पाणी भरून आणावे लागत आहे.

दिल्लीतील कोरोनाचा वेग असा..

तारीख पाॅझिटिव्ह
19 मार्च 14
18 मे 10 हजार
18 जून 49,979

 • दिल्लीत २१ हजार ३४१ उपचारानंतर घरी परतले. दिल्लीच्या सर्व रुग्णालयांत मिळून ५ हजार ४४८ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ८ हजार ४८० लोक होम आयसोलेशनमध्ये तर ११५५ केअर सेंटर व १४० सेंटरमध्ये आहेत.
 • एक महिन्यात रुग्ण ५ पट वाढून ५० हजारावर, २२ हजार घरांतच क्वाॅरंटाइन
 • दिल्लीत पहिले मेडिकल बुलेटीन १९ मार्चला आले होते
 • रुग्णालयांत ५४७१ खाटा शिल्लक, पण रुग्ण भटकताहेत
 • दिल्लीत आतापर्यंत ११ टक्के आराेग्य कर्मचारी बाधित

एम्सचे एक निवासी डॉक्टर म्हणाले, रुग्णालयांत स्टाफ दिल्लीच्या अनेक कंटेनमेंट झोनमधून येत आहे. त्यामुळे रुग्णालयात सर्व खबरदारी घेतली जात आहे. त्यानंतरही संसर्ग वाढू लागला आहे. दिल्लीत पहिले मेडिकल बुलेटिन १९ मार्चला आले होते. त्यात केवळ १४ रुग्णांना बाधा झाल्याची माहिती देण्यात आली होती. एक महिन्यापूर्वी १८ मे रोजी बाधितांची संख्या १० हजार पार झाली होती. परंतु त्याच्या एक महिन्याने ही संख्या पाचपट झाली. १८ जूनला ही संख्या ४९ हजार ९७९ वर पोहोचली. दिल्लीत लॉकडाऊन व अनलॉकमध्ये सातत्याने संसर्ग वाढल्याचे हे आकडे सांगतात. लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर ८ जून रोजी दिल्लीत २९ हजार ९४३ रुग्ण आढळून आले होते. दिल्लीत एप्रिलमध्ये पहिल्यांदा ९ कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले होते. आता ही संख्या वाढत जाऊन २४३ झाली आहे. या भागात फारशी खबरदारी घेण्यात आलेली नाही. दिल्लीत अशा भागात ये-जा करण्यास मनाई आहे. परंतु त्याची अंमलबजावणी दिसत नाही. आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल म्हणाले, सरकारने लॉकडाऊन उठवला, परंतु लोकांना घरातही मास्क घालून राहा असे सांगितले नाही. परिणामी बाहेर जाणारी व्यक्ती घरात कॅरियरसारखा विषाणू घेऊन येते आणि संपूर्ण घर बाधित होते.

रुग्णांचे हाल : भर्ती रुग्णांचे हाल दिसतात. जेवणात केवळ डाळ-तांदूळ मिळत आहे. मधुमेह असल्याने भात जमत नाही. कुटुंबीय येऊ शकत नाहीत. असेच राहायचे होते तर ते घरीच राहिलो असतो. किमान चहापाणी तरी मिळाले असते. पाण्यासाठी अनेक तास प्रतीक्षा करावी लागते, असे तेथील रुग्णांचे म्हणणे आहे. एकट्या एम्समध्ये सुमारे ५५० हून जास्त आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. तेथे कोरोना रुग्णांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती केले जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह स्टाफमध्ये ५० हून जास्त नर्स असल्याचा दावा एम्स नर्स युनियनने केला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मात्र स्टाफ केवळ ३२९ एवढा असून उर्वरित कुटुंबीय आहेत.

बातम्या आणखी आहेत...