आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पत्रकाराचा उबेर चालकावर शोषणाचा आरोप:म्हणाली - आरशातून ब्रेस्ट न्याहाळत होता, बाजूला झाले तरी मागे वळून पाहत होता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली दिल्लीच्या एका महिला पत्रकाराने उबेर चालकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. महिलेने या घटनेची ट्विटरवरून माहिती देताना म्हटले आहे की, ड्रायव्हर साइड मिररमधून माझ्या ब्रेस्टकडे पाहत होता. यामुळे ती सीटच्या दुसऱ्या बाजूला बसले. त्यानंतर चालक तिला डाव्या साइडच्या मिररमधून पाहू लागला. त्यानंतर ती थोडी आणखी बाजूला सरकली असता ड्रायव्हर तिच्याकडे वारंवार मागे वळून पाहू लागला. बुधवारी सायंकाळी 4.40 च्या सुमारास ही घटना घडली. पण ती आता उजेडात आली आहे.

दिल्ली महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे. आयोगाने सांगितले की, या प्रकरणी शहर पोलिस व कॅब एग्रीगेटर फर्मला एक नोटीस जारी करण्यात आली आहे. तसेच महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनीही FIR दाखल केला आहे.

तक्रार केल्यानंतर चालक धमकावत म्हणाला - जा, करायचे ते कर

पोलिसांनी सांगितले की, महिलेने न्यू फ्रेंड्स कॉलनीतून मालवीय नगर येथील आपल्या मित्राच्या घरी जाण्यासाठी कॅब बुक केली होती. या घटनेमुळे तिने उबेरच्या सेफ्टी फीचरचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क झाला नाही. त्यांनी ड्रायव्हरला तक्रार करण्याचा इशारा दिला. पण त्याने जा, तुला काय करायचे ते कर अशा शब्दांत धमकावले.

पोलिसांनी सांगितले की, ऑटो-रिक्षा गोविंदपुरीच्या नेहरू कॅम्पमध्ये राहणाऱ्या मोहम्मद युनूस खान याच्या नावाने नोंदणीकृत असल्याचे आढळले आहे. पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात भादंवि कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वाती मालीवाल यांनी मागवला अहवाल

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी उबेर इंडियाला नोटीस बजावून महिला सुरक्षेसंबंधीची माहिती मागवली आहे. आयोगाने उबेर इंडियाला विचारले आहे की, महिलांच्या सुरक्षेसाठी उबेरकडून कोणती पाऊले उचलण्यात येत आहेत. तसेच या प्रकरणी चालकाविरोधात कोणती कारवाई करण्यात आली, याची विचारणाही केली आहे.

सदर चालकाची कंपनीत भरती करण्यापूर्वी त्याचे पोलिस व्हेरिफिकेशन करण्यात आले होते किंवा नाही. हो, तर त्याची कॉपी आयोगाला पाठवून द्या, असेही आयोगाने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...