आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Female Judge Bag Snatching CCTV; Bag Snatching Case | Delhi Robbery | Arvind Kejriwal

दिल्लीत महिला न्यायाधीशांना लुटले:चोर बॅग हिसकावून ढकलून पळून गेले, डोक्याला गंभीर दुखापत

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील गुलाबी बाग परिसरात काही चोरांनी घराबाहेर चालत असलेल्या महिला न्यायाधीशांची बॅग हिसकावून त्यांना धक्काबुक्की करून पळ काढला. या झटापटीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना ६ मार्चची आहे. मात्र, सीसीटीव्हीच्या मदतीने दोन आरोपींना आता अटक करण्यात आली आहे.

आपल्या मुलासोबत घराबाहेर फिरत होत्या न्यायाधीश
पोलिसांनी सांगितले की, महिला न्यायाधीश रचना तिवारी आपल्या 12 वर्षांच्या मुलासोबत गुलाबी बाग परिसरातील डीए फ्लॅटच्या बाहेर रात्री 10 वाजता फिरत होत्या. त्यानंतर दोन दुचाकीस्वार युवक आले आणि त्यांनी न्यायाधीशांची बॅग हिसकावून त्यांना धक्काबुक्की करून पळ काढला. या घटनेची माहिती त्यांच्या मुलाने वडिलांना दिली. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि न्यायाधीशांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली.

या घटनेतील सहभागी आरोपींवर यापूर्वी 10 गुन्हे दाखल
महिलेने सांगितले की, त्यांच्या बॅगेत सुमारे 10 हजार रुपये, एटीएम आणि काही कागदपत्रे होती. त्याचवेळी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला पकडले आहे. त्यांच्याकडून 4 हजारांची रोकड आणि एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे. दिलशाद आणि राहुल अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी दिलशादवर यापूर्वी 10 गुन्हे दाखल आहेत. अशा अनेक घटना त्यांनी केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...