आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Fuel Hike: Delhi Lockdown Updates, Delhi Government Petrol Deisel Price Hike, VAT Added Taxes On Fuel, Liquor

दारुसह इंधनही महाग:दिल्लीत दारुनंतर आता इंधन महागले! दिल्ली सरकारने पेट्रोल आणि डीझेलवर लावला अतिरिक्त व्हॅट, मंगळवारपासूनच लागू

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
दिल्लीत दारुवर 70 टक्के अतिरिक्त कर लादण्यात आले, तरीही वाइन शॉपवर मंगळवारी अशी गर्दी आणि रांगा पाहायला मिळाल्या. - Divya Marathi
दिल्लीत दारुवर 70 टक्के अतिरिक्त कर लादण्यात आले, तरीही वाइन शॉपवर मंगळवारी अशी गर्दी आणि रांगा पाहायला मिळाल्या.
  • दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर 1.67 रुपये, तर डीझेल 7.10 रुपयांनी महागले

देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्प सध्या सुरू आहे. या टप्प्यात केंद्र आणि राज्य सरकारांकडून नागरिकांना काही प्रमाणात सूट देण्यात आल्या आहेत. लॉकडाउनमध्ये सर्वच कंपन्या आणि कारखान्यांसह व्यवहार बंद असल्याने राज्य सरकारांच्या महसूलात मोठी घट झाली आहे. हीच घट भरून काढण्यासाठी राज्य नव-नवीन शक्कल लढवत आहेत. त्यातच दिल्ली सरकारने यामध्ये दिल्लीकरांना दुसरा धक्का दिला. तसेच मंगळवारी पेट्रोल आणि डीझेलवर लागणाऱ्या व्हॅट अर्थात व्हॅल्यू अॅडेड टॅक्समध्ये वाढ केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वीच मद्य विक्रीवर सुद्धा अतिरिक्त कर लादला आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशात सुद्धा दारुवर 75 टक्के कर लादला जात आहे.

दिल्ली सरकारने व्हॅट वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर 1.67 रुपये आणि डीझेलचे दर 7.10 रुपयांनी वाढले आहेत. यातील पेट्रोलवर दिल्ली सरकारने 27 टक्के व्हॅट असलेला व्हॅट वाढवून 30 टक्के केला. तर डीझेलवर लावला जाणारा 16.76 टक्के व्हॅट आता 30 टक्के करण्यात आला आहे. व्हॅटमध्ये झालेल्या वाढीनंतर दिल्लीमध्ये डीझेल प्रति लिटर 69.29 रुपये आणि पेट्रोल प्रति लिटर 71.26 रुपये झाले आहे. हे वाढीव दर मंगळवारपासूनच लागू करण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, महसूल वाढवण्याच्या हेतूने केंद्राच्या आदेशानंतर जवळपास सर्वच राज्यांनी मद्य विक्रीवरील बंदी सुद्धा उठवली. यात दिल्ली सरकारने दारुवर अतिरिक्त कर लादले. याला विशेष कोरोना शुल्क असे म्हटले जात आहे. हा विशेष शुल्क तब्बल 70 टक्के प्रमाणे आकारला जात आहे. अर्थातच हे वाढीव दर सुद्धा राज्याच्या महसूल वाढीमध्ये मदत करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...