आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Goverment V S Facebook Case In Supream Court On Delhi Summons News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली सरकार विरुद्ध फेसबुक वाद:फेसबुक दिल्ली विधानसभा समितीच्या निशाण्यावर; समितीकडे जायचं की नाही आम्ही ठरवू- फेसबुक

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वोच्च न्यायालयात फेसबुककडून युक्तिवाद करताना हरीश साळवे म्हणाले, सध्याच्या गोंगाटात शांत राहणे केव्हाही चांगले

सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यांवरुन गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारासंबंधी चौकशी करण्यासाठी दिल्ली सरकारच्या शांती समितीने फेसबुक इंडीयाचे उपाध्यक्ष अजित मोहन यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसच्या विरोधात अजित मोहन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. सुनावणी दरम्यान अजित मोहन यांची बाजू मांडताना जेष्ठ वकील हरीश साळवे सर्वोच्च न्यायालयात म्हणाले की, आजच्या गोंगाटाच्या वातावरणात गप्प बसणे चांगले राहील.

सर्वोच्च न्यायालयाने अजित मोहन यांच्या युक्तिवादानंतर आपला निर्णय राखून ठेवला आहे. समिती गेल्या वर्षी उत्तर दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार दरम्यान फेसबूकवरील भडकाऊ भाषणाच्या भूमिकेबाबत चौकशी करत आहे. याप्रकरणी अजित मोहन यांना नोटीस पाठवत चौकशीसाठी बोलावले असल्याचे समितीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

फेसबुकने सर्वोच्च न्यायालयात केलेले 3 युक्तीवाद

  • सर्वोच्च न्यायालयात अजित मोहन यांच्याकडून जेष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. साळवे यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी खटल्यातील चौकशी प्रकरण दिल्ली विधानसभा कार्यक्षेत्रात येत नाही.
  • देशाची राजधानी दिल्लीचा कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारित येते. त्यामुळे संबंधित खटल्याच्या चौकशीसाठी समिती नेमणे हे दिल्ली विधानसभाचे काम नाही.
  • हरीश साळवे पुढे बोलताना म्हणाले की, आजच्या या गोंगाटाच्या वातावरणात शांत बसणे सोईस्कर होईल. समितीकडे जायचं की नाही हे माझे क्लाईंट ठरवतील. त्यामुळे अशा मागच्या दरवाज्याच्या माध्यमातून शक्तीच्या विस्ताराला परवानगी दिली जाऊ नये.
बातम्या आणखी आहेत...