आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली सरकारचे ‘देशभक्ती बजेट’:शहरभर 500 ठिकाणी तिरंगा फडकणार; शाळांत ‘देशभक्ती अभ्यासक्रम’ही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने दिल्लीसाठी ‘देशभक्ती बजेट’ आणले आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे अर्थ मंत्रालय आहे. त्यांनी मंगळवारी २०२१-२२ अर्थसंकल्प सादर केला. ते म्हणाले, ‘स्वातंत्र्यसंग्रामातील सेनानींना प्रणाम करत मी हे देशभक्ती बजेट सादर करत आहे. आम्ही हे संपूर्ण वर्ष स्वातंत्र्याच्या महोत्सवाच्या रूपात सादर करत आहोत. हा उत्सव १२ मार्च ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत चालेल. दिल्लीच्या प्रत्येक नागरिकाला आपल्या घराजवळच उंच तिरंगा दिसेल. आम्ही शहरात ५०० तिरंगे फडकवणार आहोत. त्यासाठी ४५ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

ते म्हणाले, दिल्ली सरकारने १० कोटी रुपयांची तरतूद शहीद भगतसिंग यांना समर्पित कार्यक्रमासाठी केली आहे. त्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा आणि स्वप्ने तरुणांपर्यंत नेण्यासाठीही स्वातंत्र्य महोत्सवांतर्गत १० कोटी रुपयांची तरतूद केली. दिल्लीच्या शाळांत ‘देशभक्ती अभ्यासक्रम’ सुरू केला जाईल. मुलांसाठी रोज एक तास देशभक्तीचा असेल.

राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न
दिल्लीचे हे ‘देशभक्ती बजेट’ केजरीवाल सरकारच्या रणनीतीचे प्रतीक मानले जात आहे. जाणकारांच्या मते, हा भाजपला राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर थेट टक्कर देण्याचा प्रयत्न आहे. त्याद्वारे देशातील इतर राज्यांपर्यंत एक संदेश देऊन आपला विस्तार करण्याचा केजरीवाल यांच्या पक्षाचा विचार आहे.

बातम्या आणखी आहेत...