आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Government Receives 42 Thousand Test Kits; Health Minister Jain Informed That There Will Be A Speedy Check

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली:दिल्ली सरकारला मिळाले 42 हजार टेस्ट किट; वेगाने तपासणी होणार असल्याची आरोग्यमंत्री जैन यांची माहिती 

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अडकलेल्या व्यक्तीला मदत करणे देशभक्ती : केजरीवाल

कोरोना संसर्गाबद्दलची तपासणी वेगाने होण्यासाठी आवश्यक टेस्ट किट दिल्लीला मिळाले आहेत. काेरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी ही तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी दिल्लीला ४२ हजार टेस्ट किट मिळाले आहेत. 

रुग्ण आढळलेल्या ठिकाणांस हॉटस्पॉट जाहीर करून त्याला सील करण्यात आले आहे. राज्याला सध्या ४२ हजार रॅपिड टेस्ट किट मिळाले, अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शनिवारी दिली. दिल्ली सरकारने कोरोना टेस्ट किटची मोठी ऑर्डर दिली होती. लवकरात लवकर किट मिळाल्यास रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होऊ शकेल, असे सरकारला वाटते. दिल्लीत गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ६७ नवे बाधित आढळून आले आहेत. आतापर्यंत ४२ व्यक्तींचा काेरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिल्लीत एकूण १७०७ कोरोनाचे बाधित आहेत. त्यापैकी ९११ रुग्णांना दिल्लीच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. परदेशातून ८३ लोक आले होते. त्यांना कोराेनाची बाधा होती. त्यांच्या संपर्कात आल्याने ३५३ लोक जणांना बाधा झाली. १९१ रुग्णांना संसर्ग कोठून झाला याची माहिती नाही. २२ जणांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. 

अडकलेल्या व्यक्तीला मदत करणे देशभक्ती : केजरीवाल

जागतिक महामारीत बाधित रुग्णांची मदत करणे हीच खरी देशभक्ती आहे. त्यामुळे या काळात कोणताही व्यक्ती कसल्याही अडचणीत सापडला तर त्याला मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शनिवारी ते बोलत होते. हा काळ कठीण आहे, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...