आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Government To Bring 21 Ready to use Oxygen Plants From France: Arvind Kejriwal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑक्सिजन:दिल्ली सरकार फ्रान्सहून आणणार 21 रेडी टू युज ऑक्सिजन प्लँट, अरविंद केजरीवाल सरकारचा निर्णय

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तामिळनाडूत ऑक्सिजन प्लँट सुरू करणार वेदांता, सुप्रीम कोर्टाने दिली मंजुरी

दिल्लीत कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन केजरीवाल सरकार बँकाॅकहून १८ टँकर आयात करणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी फ्रान्सहून २१ ऑक्सिजनचा प्रकल्पही आयात केला जाणार आहे. ते सर्व रेडी टू युज अशा स्वरूपाचे असतील. रुग्णालयांत ते कार्यरत करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.तामिळनाडूतील वेदांता कंपनीस तीन वर्षांपासून बंद पडलेल्या स्टरलाइट प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळाली आहे.

चिकित्सीय ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी हा प्रकल्प पुन्हा सुरू होणार आहे. ऑक्सिजनअभावी मृत्यू वाढत आहे. आम्ही चिंतित आहोत. आज एक राष्ट्रीय संकट आहे. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट व न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या पीठाने मंगळवारी राज्य सरकारच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या प्रकल्पात ऑक्सिजनव्यतिरिक्त इतर कोणतेही उत्पादन केले जाता कामा नये, असे काेर्टाने कंपनीला बजावले आहे. प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांच्या नावांना सरकारी निगराणी समिती मान्यता देईल.

बातम्या आणखी आहेत...