आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Government's Big Decision To Prevent Pollution; All Manufacturing Units Will Be To Close ; Only Service And High tech Industries Allowed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रदुषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारचा मोठा निर्णय:सर्व मॅन्यूफॅक्चरिंग युनिट होणार बंद; फक्त सर्व्हिस आणि हाय-टेक इंडस्ट्रीजला परवानगी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी केली घोषणा, केंद्र सरकारकडून मिळाली परवानगी

दिल्ली सरकारने प्रदुषणावर आळा घालण्यासाठी सोमवोरी मोठा निर्णय घेतला. या निर्यणानुसार आता नवीन इंडस्ट्रियल एरियामध्ये नवीन मॅन्यूफॅक्चरिंग युनिट्स लावता येणार नाहीत. तसेच, जुन्या मॅन्यूफॅक्चरिंग युनिट्सला दुसऱ्या सेक्टरमध्ये बदलण्यास सांगितले आहे. सरकारकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, शहरातील इंडस्ट्रियल एरियात नवीन मॅन्यूफॅक्चरिंग युनिटला यापुढे परवानगी मिळणार नाही. फक्त सर्व्हिस सेक्टर आणि हाय-टेक इंडस्ट्रीजला युनिट लावण्याची परवानगी असेल. तसेच, जुन्या इंडस्ट्रीयल एरियात जे मॅन्यूफॅक्चरिंग युनिट्स आहेत, त्यांना चालू युनिट बंद करुन नवीन सर्विस सेक्टर किंवा टेक इंडस्ट्री सुरू करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे.

ऑफिस सुरू करण्यासाठी स्वस्तात जागा मिळेल

केजरीवाल पुढे म्हणाले की, दिल्लीच्या इंडस्ट्रियल एरियात आतापर्यंत महाग जमीन मिळायच्या यामुळे आयटी, मीडिया, एचआर सर्विसेज, कॉल सेंटर्स, बीपीओ, टीवी प्रोडक्शन हाउस, मार्केट रिसर्च, प्लेसमेंट एजेंसी आणि इतर प्रोफेशनल्स नवीन ऑफिस सुरू करू शकत नव्हते. अशा कंपन्या गुरुग्राम, नोएडा किंवा फरीदाबादमध्ये जायच्या. आता या कंपन्यांना दिल्लीच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये स्वस्त दरात जमिनी दिल्या जातील. आतापर्यंत हे सर्व ऑफिस कॅटेगरीत यायचे आणि यांना कमर्शियल एरियात ऑफिस सुरू करण्याची परवानगी नव्हती. पण, आता त्यांना परवानगी दिली जाईल.