आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi (Gulabi Bagh) Road Accident VIDEO Footage | Car Crushed 3 Children, Delhi News

दिल्लीत भरधाव कारने 3 मुलांना चिरडले VIDEO:धडक बसताच एक जण उडून थेट कारच्या मागे पडला; फुटपाथवरील तिघेही गंभीर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील गुलाबीबाग परिसरात रविवारी एका कारने फुटपाथवर उभ्या असलेल्या तीन मुलांना जोरदार धडक दिली. यात तिनही मुले गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसून येते

एक भरधाव कार फुटपाथवर उभ्या असलेल्या मुलांना धडक देते. धडकेनंतर एक मुलगा उडून थेट कारच्या मागच्या बाजूला पडला आहे. घटना घडताच आजूबाजूला असलेले लोक धाव घेतात. सर्वत्र धावाधाव सुरू होते.

जखमी मुलांना रुग्णालयात दाखल केले

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी जखमी मुलांकडे धाव घेतली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्वरीत मदत केली.तर लोकांनी कार चालकालाही पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जखमींपैकी दोन मुले 10 वर्षांची आहेत. तर तिसरा मुलगा 6 वर्षांचा आहे.

अपघातानंतर जखमी झालेली मुले लाल वर्तुळात दिसत आहेत. सीसीटीव्ही फुटेज मधून हा फोटो सद्या व्हायरल झाला आहे.
अपघातानंतर जखमी झालेली मुले लाल वर्तुळात दिसत आहेत. सीसीटीव्ही फुटेज मधून हा फोटो सद्या व्हायरल झाला आहे.

आरोपीला केली अटक
उत्तर दिल्लीचे डीसीपी सागरसिंग कलसी यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे. गजेंद्र (30, रा. प्रताप नगर) असे त्याचे नाव आहे. रविवारी लीलावती शाळेजवळ त्याने कारने तीन मुलांना जोरदार धडक दिली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर 6 वर्षीय बालकाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे, असे डीसीपी कलसी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...