आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi HC Dismisses A Plea Seeking Direction To Suspend All Construction Activity Of The Central Vista Avenue Redevelopment Project

मोदी सरकारला दिलासा:'सेंट्रल व्हिस्टा आवश्यक, काम सुरुच राहणार' हायकोर्टाने याचिकाकर्त्याला ठोठावला 1 लाखाचा दंड

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या 250 मजुरांची बांधकाम परिसरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

नरेंद्र मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट 'सेंट्रल विस्टा'चे काम थांबवण्याच्या प्रयत्नांना झटका लागला आहे. दिल्ली हायकोर्टने सोमवारी म्हटले की, सेंट्रल विस्टा आवश्यक आहे, याचे काम सुरुच राहणार. हा प्रोजेक्ट थांबवण्यासाठी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने रद्द केली आहे.

शिवाय, याचिकाकर्त्यावर 1 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. यापूर्वी, केंद्र सरकारने दिल्ली हायकोर्टात आपले उत्तर दाखल करत, याचिकाकर्त्यावर कारवाईची मागणी केली होती.

केंद्राने म्हटले होते की, हा प्रोजेक्ट थांबवण्यासाठी जनहिताचे कारण दिले जात आहे. याचिका कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग झालाय. आपल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटले की, डीडीएमए (दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) ने 19 एप्रिल 2021ला आदेश जारी केले होते. त्यानुसार, कर्फ्यू काळा मजुरांच्या राहण्याची सोय केल्यावर काम सुरू ठेवता येते. सेंट्रल व्हिस्टाच्या साइटवर 19 एप्रिलपासून 400 मजुर काम करत होते. सध्या 250 मजुर काम करत असून त्यांच्या राहण्याची व्यवस्था तिथेच करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...