आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत हिट अँड रन:कारचालकाचा आधी बाइकर्सशी झाला वाद, नंतर धमकी देऊन दिली दुचाकीला धडक

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील रोड रेजचा एक व्हिडिओ समोर आला आहे. बाइकर्सच्या एक ग्रुपसोबत वाद झाल्यानंतर SUV चालकाने त्यांना धमकावले आणि नंतर दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. अर्जनगड मेट्रो स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ बाइकर्स ग्रुपमधील एका सदस्याच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक मिनिट 14 सेकंदाचा हा व्हिडिओ रविवारचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एसयूव्ही चालक दुचाकीस्वारांना धमकावताना दिसत आहे, तर दुचाकीस्वार वेग कमी करून एसयूव्हीचा पाठलाग करताना दिसत आहेत. एका दुचाकीस्वाराने आपली दुचाकी एसयूव्हीच्या पुढे घेतली असता, एसयूव्हीमध्ये बसलेल्या व्यक्तीने त्याला मागून धडक दिली आणि त्यानंतर तो पळून गेला.

धडकेमुळे दुचाकीस्वार रस्त्यावर घसरत गेला
एसयूव्हीच्या धडकेमुळे दुचाकीस्वार रस्त्यावर पडला आणि लांबपर्यंत घसरत गेला. मात्र, बाइकिंग गियर्समुळे त्याचा जीव वाचला. या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराची दोन हाडे निखळली असून त्याला अनेक जखमा झाल्या झाल्याचे बाइकर्स ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. त्याची प्रकृती सुधारत आहे.

वादानंतर धमकावून धडक दिली
दुचाकीस्वार म्हणाला, 'मी माझ्या 8-10 मित्रांसह गुरुग्रामहून दिल्लीला परतत असताना तो आमच्याकडे आला आणि वेगाने गाडी चालवू लागला. त्याने माझ्या मित्राला धमकावून शिवीगाळ केली. माझे मित्र स्लो झाले, पण मी पुढे गेलो. तो व्यक्ती वेगाने आला आणि त्याने माझ्या दुचाकीला धडक देऊन पळून गेला.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला, आरोपी फरार
दिल्लीतील अर्जनगढ मेट्रो स्टेशनजवळ घडलेल्या या घटनेबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत एसयूव्ही चालकाला पकडण्यात आलेले नाही. त्यांच्या कारचा क्रमांक दुचाकीस्वारांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दिल्ली पोलिसांनी वाहनाची ओळख पटवली असून ते याप्रकरणी कारवाई करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...