आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi High Court Asks, Does BJP MP Gautam Gambhir Have A License To Distribute Medicines?

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यायालयाचा 'गंभीर' सवाल:भाजप खासदार गौतम गंभीर यांच्याकडे औषधं वाटण्याचा परवाना आहे आहे का ?

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी कोरोनावरील फॅबीफ्ल्यू औषधांचे वाटप केले

माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी कोरोनासाठी वापरले जाणऱ्या फॅबीफ्ल्यू औषधांचे वाटप केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. गंभीर यांच्या औषध वाटपावर दिल्ली उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. 'कोरोनाचे औषध वाटप करायला गौतम गंभीर यांच्याकडे लायसन्स आहे का ? या औषधांचे वाटप करण्यापूर्वी गंभीर यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता का ?' असे प्रश्न न्यायालयाने विचारले आहेत.

भाजप खासदार गौतम गंभीर यांनी 25 एप्रिल रोजी दिल्लीतील लोकांसाठी फॅबीफ्ल्यू औषध वाटप करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांच्या कार्यालयातून सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत औषधांचे वाटप झाले. या औषध वाटप प्रकरणाची दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विपीन सांघी आणि रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायालयाने हा प्रश्न विचारला. लायसन्स नसताना कोणालाही औषध देता येत नाही. ही औषधे वाटण्यासाठीही गौतम गंभीर यांनी परवाना घेतला होता का ? कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचे वाटप करत होते? असा सवाल कोर्टाने केला आहे. तसेच, गंभीर यांच्याकडे असलेल्या औषधांच्या साठ्यावरही कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...