आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi High Court Dismissed Lawsuit Filed By Juhi Chawla Against 5G Networks Said Plaintiff Abused Process Of Law Imposes Fine Of 20 Lakhs

अभिनेत्री जुही चावलाला दणका:5G विरोधात दाखल केलेली याचिका रद्द करत कोर्टाने जुहीवर लावला 20 लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुनावणीदरम्यान गाणे गाणाऱ्याला शोधण्याचे कोर्टाचे आदेश

अभिनेत्री जुही चावला हिला हायकोर्टाने दणका दिला आहे. जुहीने दिल्ली हायकोर्टात 5G टेक्नोलॉजीविरोधात दाखल केलेली याचिका रद्द करत कोर्टाने जुहीवर 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच, जुहीने प्रसिद्धीसाठी याचिका कायदा प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याचा ठपकाही कोर्टाने लावला.

सुनावणीदरम्यान गाणे गाणाऱ्याला शोधण्याचे कोर्टाचे आदेश
कोर्टाने या निर्णयावेळी मागच्या सुनावणीदरम्यान झालेल्या गोंधळाचा उल्लेख केला. न्यायालयाने म्हटले की, जूही चावलाने सुनावणीची लिंक सोशल मीडियावर सर्कुलेट केली होती. यामुळे, सुनावणीत तीनदा अडचणी आल्या. यात अडचणी आणणाऱ्यांचा आणि सुनावणीदरम्यान गाणे गाणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित व्यक्तीला आणि बेकायदेशीरपणे सुनावणीत भाग घेतलेल्या सर्वांना न्यायालयाने अवमान नोटीस बजावली आहे.

याचिकेत जुहीने काय म्हटले ?

जुही चावलाने 5G टेक्नोलॉजी लागू केल्यावर माणसांवर आणि प्राण्यांवर वाईट परिणाम पडणार असल्याचे मुद्दे याचिकेत मांडले होते. तसेच, यासंबंधी तपास करण्याची अपील केली होती. जुहीने न्यायालयात 5G टेक्नोलॉजीच्या इम्प्लीमेंटेशनशी संबंधित अभ्यास करण्याची मागणीदेखील केली होती.

बातम्या आणखी आहेत...