आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली हाय कोर्टाने सोमवारी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी एका महिलेला अनोखी शिक्षा ठोठावली. कोर्टाने या महिलेला 2 महिन्यांपर्यंत आठवड्यातील 5 दिवस अंध शाळेत समाजकार्य करण्याचे आदेश दिलेत. हे प्रकरण आरोपी व तक्रारदार महिलेत समेट होऊन आरोपीने FIR दाखल करण्यासाठी कोर्टात अपील केल्यानंतर उजेडात आले.
कोर्ट बलात्काराचा गुन्हा रद्द करताना म्हणाले की, महिलेला कुटुंब व मुलेही आहेत. त्यामुळे तिला समाजसेवा करण्याची शिक्षा दिली जात आहे. यावेळी आरोपीलाही 50 रोपटे लावण्याचे निर्देश देण्यात आले.
समेट झाल्यानंतर आरोपीने केली होती याचिका
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या समेटपत्रानुसार, आरोपीने केव्हाही आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले नसल्याचे मान्य केले होते. महिलेचा आरोपीसोबत आर्थिक वाद सुरू होता. यामुळे ती त्रस्त झाली होती. या काळात ती काही चुकीच्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे तिने एफआयआर दाखल केला होता.
आरोपीने दोन्ही पक्षांत तडजोड झाल्यानंतर एफआयआर रद्द करण्याची मागणी करत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या एफआयआरमध्ये महिलेने आरोपीवर कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध पाजून बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
50 रोपटी लावून 5 वर्षांपर्यंत देखभाल करण्याचे आदेश
न्यायमूर्ती जसमीत सिंग यांचे एकल खंडपीठ म्हणाले की, एफआयआरमध्ये नमूद आरोप व तडजोड पत्रातील गोष्टी पूर्णतः वेगवेगळ्या आहेत. महिलेने कायद्याचा गैरवापर केला. तिने नैराश्यातून बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला.
म्हणजे ज्याच्याविरोधात तक्रार दाखल केली, त्याचाही यात प्रकरणात थोड्याफार प्रमाणात दोष आहे. त्यामुळे आरोपीला शहराच्या रोहिणी अंचलमध्ये 6 आठवड्यांत 50 रोपटे लावण्याचे निर्देश दिले जात आहेत. त्याला या रोपट्यांची सलग 5 वर्षे देखभाल करावी लागेल. तसेच त्याचा अहवाल दर 6 महिन्यांत न्यायालयात सादर करावा लागेल, असे कोर्ट म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.